Maratha Reservation Survey: मराठा सर्वेक्षण... दांडीबहाद्दर शिक्षकांना संभाजीनगर महापालिका कारणे दाखवा नाेटीस बजावणार

बारावीची सराव परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.
show cause notice to praganak and teachers for remaning absent maratha survey
show cause notice to praganak and teachers for remaning absent maratha surveysaam tv
Published On

- Ramu Dhakne

Chhatrapati Sambhajinagar News :

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने शहरात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणाच्या कामासाठी प्रगणक शिक्षकांनी दांडी मारली. हा प्रकार छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने अंत्यंत गांभीर्याने घेतला आहे. संबंधित शिक्षकांना प्रशासन कारणे दाखवा नाेटीस बजावणार आहे. (Maharashtra News)

राज्यातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने 23 ते 31 जानेवारी दरम्यान राज्य सरकार तर्फे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषद शाळेसह इतर खाजगी माध्यमिक शाळेवरील आणि महाविद्यालयाच्या शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे.

show cause notice to praganak and teachers for remaning absent maratha survey
Buldhana Crime News : सासऱ्याचा सुनेसह 5 वर्षाच्या नातवावर कुऱ्हाडीने हल्ला, दोघे मृत्यूमुखी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 हजार तर शहरातील 1 हजार 700 शिक्षक या सर्वेक्षणाच्या कामावर रुजू झाले आहेत. यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची सराव परीक्षा स्थगित करण्यात आली असल्याची माहिती विभागीय मंडळाने दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान अनेक प्रगणक शिक्षकांनी मंगळवारी सर्वेक्षणाच्या कामासाठी दांडी मारली. त्यामुळे त्यांना नोटिसा बजावल्या जाणार असल्याचे महापालिकेचे उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांनी साम टीव्हीला सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

show cause notice to praganak and teachers for remaning absent maratha survey
Chhatrapati Sambhajinagar Crime News : कोऱ्हाळे फाट्यानजीक अपघातात गाडीचा चक्काचूर, तहसील कार्यालयातील तिघे जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com