- रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेवकांनी गेल्या एक महिन्यापासून बेमुदत संपत सुरूच ठेवला आहे. त्यामुळे शहरातील आयुष्यमान भारत गोड कार्ड योजनेची टार्गेट पूर्ण करण्यात आता अडथळा निर्माण झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
13 फेब्रुवारीपासून महानगरपालिकेतर्फे 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुलांसाठी जंतनाशक गोळी अभियान राबवण्यात येणार असल्याने या अभियानातही अडचणी येणार आहे. तत्पूर्वी ही बाब लक्षात घेत महापालिका आयुक्त श्रीकांत चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत. 24 तासात कामावर हजर व्हा अन्यथा निलंबित केले जाईल अशी अंतिम नोटीस त्यांनी आशा सेविका यांना बजावली आहे. (Maharashtra News)
दरम्यान मानधनवाढीसह आपल्या विविध मागण्यांसाठी महिनाभरापासून सुरू असलेल्या आशा संघटनेचा राज्यव्यापी संपत महापालिकेच्या आरोग्य विभागातील 511 अशा स्वयंसेविका सहभागी झाल्या आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.