Sambhajinagar: तू मला काय बोललीस? पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाला मारहाण; पाहा धक्कादायक VIDEO

Sambhajinagar Police: संभाजीनगरमध्ये एका महिलेने पोलिस ठाण्यात येऊन महिला पोलिसाला बेदम मारहाण केली. यावेळी तिने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Sambhajinagar: तू मला काय बोललीस? पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाला मारहाण; पाहा धक्कादायक VIDEO
Sambhajinagar Police Saam TV
Published On

माधव सावरगावे, संभाजीनगर

संभाजीनगरमध्ये एक महिलेने पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या संशयित आरोपीसोबत ही महिला आली होती. या महिलेने पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण कली. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन पोलिस ठाण्यामध्ये घडली. त्यावरून रजिया रियाज शेख हिच्यावर बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhajinagar: तू मला काय बोललीस? पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाला मारहाण; पाहा धक्कादायक VIDEO
Chhatrapati Sambhajinagar: 350 महापालिका कर्मचारी, 200 पोलिस, 20 जेसीबी,संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई|VIDEO

बिडकीन पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचारी समीना अहमद शेख या ड्युटीवर होत्या. त्यावेळी संशयित आरोपी रजिया शेख ही पोलिस ठाण्यातील पीएसओ रूममध्ये आली. तू मला काय बोललीस? असे म्हणत तिने पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या समीना अहमद शेख यांना अरेरावी करत शिवीगाळ केली. यानंतर तिने महिला पोलिसाचे कपडे ओढून गालात चापट मारली आणि गळ्यातील दोन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली.

आरोपी महिलेने इतक्यावरच न थांबता तिने महिला पोलिसाला जीवे मारण्याची धमकीही दिली. पोलिस ठाण्यात त्यावेळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या मारहाणीचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. याबाबत महिला पोलिस कर्मचारीने तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.

Sambhajinagar: तू मला काय बोललीस? पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाला मारहाण; पाहा धक्कादायक VIDEO
कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

दरम्यान, मुंबईनजीकच्या नालासोपाऱ्यात ट्रॅफिक पोलिसांना मारहाण करण्यात आल्याची घटना आजच घडली. नालासोपाराच्या प्रगतीनगरमध्ये दोन वाहतूक पोलिसांना बापलेकाने जबर मारहाण केली. भरचौकात सिग्नलजवळ या दोघांनी ट्रॅफिक पोलिसांना मारहाण केली. बापाने ट्रॅफिक पोलिसाला पकडून रस्त्यावर पाडून बेदम मारहाण केली. त्यानंतर मुलाने ट्रॅफिक पोलिसाला लाथांनी मारहाण केली. ही घटना घडत असताना घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. दुसऱ्या पोलिसांनी या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याने त्यांना देखील मारहाण केली. या प्रकरणी बापलेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhajinagar: तू मला काय बोललीस? पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाला मारहाण; पाहा धक्कादायक VIDEO
Sambhajinagar Crime: विश्वास नांगरे पाटील यांच्या AI चेहऱ्याआडून मोठी फसवणूक, सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ७८ लाखांचा गंडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com