Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

Attack On Former Shiv Sena Shinde Group Corporator’s House : नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. काही गुंडांनी शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला केला. नगरसेविकेवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केलाय.
Attack On Former Shiv Sena Shinde Group Corporator’s House
Goons attack former Shiv Sena Shinde group corporator’s house in Nandurbar, women injured.Saam Tv
Published On
Summary
  • नंदुरबार शहरातील रायसिंग पूरा परिसरातील घटना

  • हल्ल्यात घरातील महिला जखमी इतर साहित्यांचीही केली तोडफोड.

  • घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर काही गुंडांनी हल्ला करत घरातील साहित्यांची तोडफोड केली. घरात घुसून हल्लेखोरांनी माजी नगरसेविकेवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना नंदुरबार शहरातील रायसिंग पूरा परिसरात घडली. या हल्ल्यात घरातील काही महिला जखमी झाल्या आहेत.

घरातील पुरुष मंडळी दुखद घटनेच्या ठिकाणी बाहेर गेले असता हल्लेखोरांनी घरावर हल्ला केला. हल्ल्याचा घटनेने नंदुरबार शहरात खळबळ उडालीय. घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलाय. हल्लेखोरांमधील काहीजण हे नगरसेविकाच्या कुटुंबियांच्या ओळखीचे होते. घरात पुरुष मंडळी नसताना हल्लेखोर घरात घुसले आणि त्यांनी नगरसेविकेवर चाकू हल्ला करत घरातील साहित्यांची तोडफोड केली

Attack On Former Shiv Sena Shinde Group Corporator’s House
Shocking: संतापजनक! गायिकेवर सामूहिक बलात्कार, खोटंनाटं सांगून लॉजवर बोलावून घेतलं अन्...

या हल्लेप्रकरणी अर्जुन मराठे यांनी साम टीव्ही बोलताना सांगितले की, घरातील पुरुष मंडळी मयतीच्या ठिकाणी गेले होती. त्याची चुलत आजीचे निधन झालं होतं, त्या ठिकाणी ते गेले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी घरात तोडफोड केली. ते दारू प्यायले होते. त्यातील काही जण हद्दपार झालेले होते. हद्दपार गुन्हेगारांवर अनेकप्रकारचे गु्न्हे दाखल आहेत. त्यांच्यावर खून, दरोडो, अत्याचारचे गुन्हे दाखल आहेत.

Attack On Former Shiv Sena Shinde Group Corporator’s House
प्रायव्हेट पार्टवर २३ ठिकाणी स्टेपलर मारले, नंतर पेपर स्प्रे मारत...; कपलचे २ तरुणांसोबत भयंकर कृत्य

हद्दपार गुन्हेगार शहरात कसे काय शहरात आले असा प्रश्न अर्जून मराठे यांनी केलाय. शहरातील गुंडांना कायद्याचा धाक नाहीये. माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला करण्याची त्यांची हिंमत त्याचमुळे झाली. दरम्यान या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी असं मागणीही त्यांनी केली.

घरातील एका महिलेने आपबीती सांगितली, घरात मुलांचा अभ्यास घेत असताना ३५ जणांनी घरावर हल्ला केला. त्यातील ३ जण घरात घुसले, त्यांनी घरातील साहित्याची तोडफोड केली. त्यातील एक जण चाकू हल्ला करत होता. त्याचा हल्ला वाचवण्यासाठी हात मध्ये घातला. त्यावेळी हाताच्या बोटाला चाकू लागला. त्याने गळ्यातील पोत ओढून घेतली. हल्लेखोर पोटात चाकू भोसकण्याचा प्रयत्न करत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com