Shocking: संतापजनक! गायिकेवर सामूहिक बलात्कार, खोटंनाटं सांगून लॉजवर बोलावून घेतलं अन्...

Odisha Crime: भुवनेश्वरमध्ये धक्कादायक घटना घडली. म्यूझिक प्रोजेक्टचं आमिष दाखवून तीन आरोपींनी एका गायिकेला नशा देऊन लॉजमध्ये नेलं आणि सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी तत्काळ तिघांनाही अटक केली.
Shocking: संतापजनक! गायिकेवर सामूहिक बलात्कार, खोटंनाटं सांगून लॉजवर बोलावून घेतलं अन्...
Published On
Summary
  • भुवनेश्वरमध्ये गायिकेवर 3 जणांनी सामूहिक बलात्कार केला.

  • आरोपींनी म्यूझिक प्रोजेक्टचं आमिष दाखवून पीडितेला जाळ्यात ओढले.

  • दारू आणि अंमली पदार्थ पाजल्यानंतर लॉजमध्ये अत्याचार करण्यात आला.

  • पोलिसांनी आरोपींना अटक केली असून महिलांच्या सुरक्षेबाबत संताप वाढला आहे.

ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये सामूहिक बलात्काराच्या एका भयानक घटनेने जनतेला हादरवून सोडले आहे. एका गायिकेला मोठ्या म्यूझिक प्रोजेक्टचं आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढण्यात आले. चंद्रशेखरपूर परिसरातील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना १० सप्टेंबर रोजी घडली असून, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

नेमकं काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडितेला प्रथम दारू पाजण्यास भाग पाडले आणि नंतर अंमली पदार्थ मिसळलेले कोल्ड्रिंक दिले. काही वेळातच ती बेशुद्ध पडली आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. महिला कसाबसा आरोपींच्या तावडीतून सुटून घरी पोहोचली आणि कुटुंबीयांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर तिने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Shocking: संतापजनक! गायिकेवर सामूहिक बलात्कार, खोटंनाटं सांगून लॉजवर बोलावून घेतलं अन्...
Crime News: धक्कादायक! जखमी कुत्र्याला वाचवायला तरूणी कारमधून उतरली, नराधमाने दोनवेळा विनयभंग केला

या घटनेत इतर व्यक्तींचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणानंतर भुवनेश्वरसारख्या शहरात महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिकांमध्ये प्रचंड संताप असून कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

Shocking: संतापजनक! गायिकेवर सामूहिक बलात्कार, खोटंनाटं सांगून लॉजवर बोलावून घेतलं अन्...
Crime News: भयंकर! नवऱ्यानं पत्नीला मोमोजमधून ड्रग्ज दिलं, मित्रासोबत बलात्कार केला अन् रस्त्यावर फेकलं

याआधीही ओडिशातील बालासोर जिल्ह्यातून एका २३ वर्षीय मुलीवर सहा महिने बंदी बनवून ठेवून सामूहिक बलात्काराचा प्रकार समोर आला होता. आरोपींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला होता. पोलिसांनी त्या प्रकरणात मुलीची सुटका करून तिला पुनर्वसन केंद्रात दाखल केले होते. या घटनांनी राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

Shocking: संतापजनक! गायिकेवर सामूहिक बलात्कार, खोटंनाटं सांगून लॉजवर बोलावून घेतलं अन्...
Shocking: धक्कादायक! बहिणी मावशीच्या घरी निघाल्या, नराधमांनी दोघींवर जंगलात केला सामूहिक बलात्कार, भयानक कृत्यानंतर मोबाईल घेऊन पसार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com