भयंकर! पोटच्या २ मुलांकडून आई वडिलांची हत्या; घरातच दोघांना संपवलं, कारण फक्त..

Sons Kill Parents for Not Giving Household Expenses: रायगडच्या म्हसळा तालुक्यात भयंकर घडलं. दोन मुलांकडून आई वडिलांची निर्घृण हत्या.
Crime News
Crime NewsSaam Tv Marathi
Published On
Summary
  • दोन मुलांकडून आई वडिलांची हत्या.

  • घर खर्च राहण्याच्या वादातून खून.

  • पोलिसांकडून आरोपींना अटक.

रायगडच्या म्हसळा येथील मेंदडी येथून माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पोटच्या मुलांनी आपल्या आई वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. घर खर्च देत नाही, तसेच घरी राहू देत नाही म्हणून दोन मुलांनी आई वडिलांचा जीव घेतला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. तसेच दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

महादेव कांबळे आणि विठाबाई कांबळे असे मृत दांपत्याचे नाव आहे. हे दांपत्या आपल्या मुलांसोबत म्हसळा येथील मेंदडी गावात वास्तव्यास होते. दोन दिवसांपूर्वी दोघांचा मृतदेह राहत्या घरात सापडला. या प्रकरणाची माहिती मिळताच म्हसळा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली.

Crime News
'६,५०० रूपयातील साडेचार मॅडमच्या खात्यात पाठव'; शेतकऱ्याच्या अनुदानावर शासकीय कर्मचाऱ्याचा डोळा, Audio क्लिप व्हायरल

पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपास करीत हत्येचा छडा लावला. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वृद्ध दांपत्याच्या दोन मुलांनीच आपल्या आई वडिलांचा खून केल्याचं समोर आलं. नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळे अशी दोन आरोपींची नावे आहेत. आई वडील आपल्याला घरखर्च देत नाहीत, तसेच घरात राहू देत नाहीत, याच गोष्टीचा राग दोन्ही मुलांच्या मनात होता.

Crime News
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; २ बड्या नेत्यांकडून रामराम, भाजपचं कमळ हाती घेण्याचं निश्चित

दोन्ही मुलांनी आई वडिलांनी ठार मारण्याचा निर्णय घेतला. दोघांनी मिळून आई वडिलांची हत्या केली. ही बाब पोलीस तपासातून समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करून आरोपी नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळेला अटक केली आहे. या घटनेनंतर म्हसळा गावात खळबळ उडाली असून, पुढील तपाल पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com