धक्कादायक : नागपूरमध्ये १४ वर्षीय मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार!

2020 ते 2022 या दरम्यान आरोपीने 14 वर्षीय मुलीला धमकावून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
धक्कादायक : नागपूरमध्ये १४ वर्षीय मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार!
धक्कादायक : नागपूरमध्ये १४ वर्षीय मुलीवर दोन वर्षांपासून बलात्कार!Saam tv
Published On

नागपूर : नागपूर शहरातील जरीपटका पोलिस स्टेशन अंतर्गत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपीने धमकावून मार्च 2020 ते 9 फेब्रुवारी 2022 यादरम्यान जबरदस्ती ने शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले आहेत. शाहरुख नामक 21 वर्षीय आरोपीने पीडितेवर वेळोवेळी बलात्कार (Rape) केल्याची तक्रार जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईवडिलांनी दाखल केलेली आहे. (Nagpur Breaking News Rape On Minor Girl)

हे देखील पहा :

आरोपी हा पीडित अल्पवयीन मुलीच्या (Minor Girl) परिचयाचा असून त्याने या पीडित मुलीशी जवळीक साधून नंतर वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले. घटनेचे गांभीर्य पाहून जरीपटका पोलिसांनी (Police) आरोपीला तात्काळ अटक केली आहे. आरोपी (Accused) वरती पॉक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com