Maharashtra Politics : आदित्य ठाकरेंचे CM एकनाथ शिंदेंना 'ओपन चॅलेंज'; म्हणाले, त्यांच्यात हिंमत नसेल तर मी...

Aaditya Thackeray Vs Eknath Shinde : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्यात विस्तवही जात नाही.
Aaditya Thackeray Vs Eknath Shinde
Aaditya Thackeray Vs Eknath ShindeSAAM TV

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग

Aaditya Thackeray Vs Eknath Shinde :

शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्यात विस्तवही जात नाही. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर तिखट वाकबाण सोडले जातात. आदित्य ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्र्यांना आधीच वरळीतून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. त्यांच्यात हिंमत नसेल तर मी ठाण्यातून निवडणूक लढवेन, असं आदित्य म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ठाण्यातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांवर उत्तर देताना, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला. मी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिलेले होते. त्यांची हिंमत नसेल तर मी ठाण्यातून निवडणूक लढवेन, असं आदित्य म्हणाले.

मी महाराष्ट्राच्या घरात चाललो आहे. दिल्ली आणि गुजरातच्या घरात चाललो नाही, अशा शब्दांत आदित्य यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला उत्तर दिले. महिला आरक्षण विधेयकावरही त्यांनी भाष्य केले. आमचं महिला आरक्षण विधेयकाला समर्थन आहे. पण हे विधेयक म्हणजे निवडणुकीपुरता जुमला आहे, असे ते म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आदित्य ठाकरे भजनात तल्लीन

आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग तळगाव येथे विनायक राऊत यांच्या निवासस्थानी आले होते. राऊतांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे त्यांनी दर्शन घेतले. यावेळी ते टाळ हाती घेऊन भजनी मंडळाला साथसंगत केली.

Aaditya Thackeray Vs Eknath Shinde
OBC Morcha: ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका; बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

वैभव नाईकांचा शिंदेंना टोला

आदित्य ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरेंचा दौरा राजकीय फायद्यासाठी नसून हा भावनिक दौरा आहे. ज्या कोकणाने शिवसेनेला घराघरात पोहोचवलं, त्या कोकणी माणसाच्या घरी कसा गणेशोत्सव साजरा होतो, याची उत्कंठा आदित्य ठाकरेंना होती. त्यासाठी हा दौरा आहे, असेही ते म्हणाले.

ज्यांच्याकडे शिवसेना पक्ष वाढवण्याची जबाबदारी होती त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी ही जबाबदारी घेतली आहे. ते बाहेर पडल्यावर काय निकाल येतात ते टीका करणाऱ्यांना येणाऱ्या काळात दिसेलच, असा टोला नाईक यांनी शिंदेंना लगावला.

Aaditya Thackeray Vs Eknath Shinde
Aditya Thackeray In Kokan : तुमचं आमचं नव्हे हे गद्दार, गँगस्टर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरांचे सरकार : आदित्य ठाकरे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com