मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवर यावर्षी देखील शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. शिंदे गटाने मैदानासंदर्भात महापालिकेकडे केलेला अर्ज आता मागे घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता दसरा मेळावा कुठे घ्यायचा, असा प्रश्न शिंदे गटासमोर आहे. त्यासाठी जागेचा शोधही शिंदे गटाने सुरु केला आहे.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी टीकास्त्र सोडलं आहे. शिंदे गटाने दसरा मेळावा घेऊ नये. घ्यायचा असेलच तर तो भाजपच्या कार्यालयात घ्यावा, अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे. (Latest Marathi News)
मोदी-शाहांचे मोठेपण गाणाऱ्यांना शिवसेनेचे विचार मांडण्याचा कुठलाही अधिकार नाही. ह्यांच्या हातात आता पक्षाची ध्येय, धोरणे राहिली नसून ती भाजपच्या हातात आहेत. शिंदे गटाची भूमिका भाजप ठरवणार आहे, अशा शब्दात वैभव नाईक यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.
शिंदे गटाने दसरा मेळावा घेण्यापेक्षा मोदींची सभा घ्या. भाजपमध्ये तुमचा पक्ष विलीन होणार आहे. शिवसेनेमध्ये अडथळे आणण्यासाठी शिंदे गटाचा वापर केला जातो आहे.
यांच्या मेळाव्याला गर्दी कशी होते, कोण उत्तर भारतीय होते, कोण बिहारी होते, कोण भाषण करताना लोक उठून गेले, हे सगळ्यांनी पाहिलं आहे. शिवतीर्थावर एकही रुपया न देता जी गर्दी होते, ती शिवसेनेच्या विचारांचं सोनं लुटायला येतात. मात्र तुमची गर्दी विचारांची नसते, असंही वैभव नाईक यांनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.