Sanjay Raut : देशात लोकशाही आहे कुठे, तुरूंगात मलाही मारण्याचा प्रयत्न होता; संजय राऊत काय म्हणाले, वाचा...

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSaam Tv

Sanjay Raut News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. देशात लोकशाही कुठे आहे? माझ्यासारख्या माणसाला तुरूंगामध्ये पाठवलं आणि मलाही आतमध्ये जवळजवळ मारण्याचाच प्रयत्न होता. मी याच्यावर योग्य वेळी बोलेल. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.  (Latest Marathi News)

Sanjay Raut Latest News
Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा धक्का! सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला? वाचा...

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद मृत्युवरून पुन्हा एकदा राजकारण पेटलं आहे. आज खासदार संजय राऊत यांनी वारिसे यांच्या कुटुंबियांना भेट दिली.

पत्रकार वारिसे यांची हत्या झाली. मात्र हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे. सरकारने एसआयटी नेमली असली तरी तिचा तपास निःपक्षपाती होईल का, अशीच शंका आहे, असे आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वारिसे यांना चिरडून टाकण्यात आलं, त्या पेट्रोल पंप आणि त्या आजू-बाजूचे ३-४ सीसीटीव्ही एकचा वेळी बंद कसे, असा मोठा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. म्हणजेच स्थानिक पोलिसदेखील दबावाखाली काम करत असल्याची टीका राऊत यांनी केली.

Sanjay Raut Latest News
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाची मागणी फेटाळली; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..,

'तुरुंगात मलाही मारण्याचा प्रयत्न झाला होता'

कोकणातला तरुण पत्रकार अशा प्रकारे मारला गेला. त्याला मारण्यात आलं, हे सगळ्यांसाठी धक्कादायक आहे. तुम्ही असे किती खून करणार आहात? आणि किती पचवणार आहात? असा सवालही संजय राऊत यांनी राज्य सरकारला केला. (Maharashtra Political News)

देशात लोकशाही कुठे आहे? माझ्यासारख्या माणसाला तुरूंगामध्ये पाठवलं आणि मलाही आतमध्ये जवळजवळ मारण्याचाच प्रयत्न होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. मी याच्यावर योग्य वेळी बोलेल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बेकायदेशीर सरकार किती काळ चालवायचे?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या बाबतीत आज निर्णय लागेल अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र तसे झाली नाही. स्वत: न्यायालयानं याबाबत निर्णय घेणं सोप नसल्याचं सांगितल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. न्यायालयाला दोन्ही बाजूंची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जे सत्य आहे, जे घटनेनुसार आहे, त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल असेही राऊत म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com