Breaking : महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही - एकनाथ शिंदे

महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaamTv News
Published On

नवी मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये (mva government) बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस राहणार की जाणार ? यासाठी उद्या दिल्लीत कॉंग्रेस हायकमांडकडून निर्णय घेतला जाणार असल्याचं समजते. या सर्व घडामोडींमुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मार्गदर्शनाने काम करतंय, असं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलं आहे.

Eknath Shinde
Breaking : महाविकास आघाडीत बिघाडी ? काँग्रेस हायकमांड उद्या घेणार निर्णय

उद्या दिल्ली मध्ये होणाऱ्या काँग्रेस हायकमांडच्या बैठकीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने काम करतंय. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार हे गेले अडीच वर्षे चांगलं काम करत आहे. विकासाची कामे कुठेही थांबली नाहीत. विकासाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात राज्यात सुरू आहेत. काँग्रेसचे आमदार , मंत्री सर्व मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करत आहेत, असंही शिंदे म्हणाले आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com