- रणजीत माजगावकर
ऐन दिवाळीत (diwali 2023) कोल्हापूरकरांना अभ्यंग स्नान घालण्यासाठी काळम्मावाडी धरणातून (Kalammawadi Dam) थेट कोल्हापूरला थेट पाईपलाईन द्वारे पाणी आणलं गेलं खरं, मात्र या पाण्यामुळे आता कोल्हापुरातल्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फाटके फुटू लागले आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या पाणी पूजनानंतर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी पाटील यांच्यावर टीका केली. (Maharashtra News)
एका बाजूला थेट पाईपलाईन ही आपल्या प्रयत्नामुळे आली असं काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (mla satej patil) म्हणत असतानाच दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर (rajesh kshirsagar) यांनी या योजनेसाठी सर्वात पहिलं उपोषण करणारा आमदार मीच असल्याचा दावा केला आहे.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एका काँग्रेसच्या नेत्याने 75 कोटी रुपयांचा ढपला पाडल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचं नाव न घेता केलेला आहे.
तसंच या 75 कोटी रुपयांच्या ढपल्यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. या थेट पाईपलाईन मूळं कोल्हापुरात मात्र राजकीय आरोप प्रत्यारोपांची दिवाळी सुरू झालेली दिसून येत आहे.
काळम्मावाडीचे पाणी शुक्रवारी कोल्हापूरात
कोल्हापुरातील पोई खडी येथील पंपिंग स्टेशन येथे काळम्मावाडीचे पाणी थेट पाईपलाईनद्वारे शुक्रवारी पाेहचले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पाण्याचे पूजन केले. त्यावेळी आमदार ऋतुराज पाटील (mla ruturaj patil), आमदार राजश्री जाधव (mla rajshri jadhav) यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
कोल्हापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवण्याच्या माझ्या प्रयत्नांना आई अंबाबाईच्या आशीर्वादामुळे आणि कोल्हापूरकरांच्या सदिच्छांमुळे आज अखेरीस यश मिळाले असे आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.