एकनाथ शिंदेंनी केली संजय राऊतांच्या तब्येतीबाबत विचारपूस; काय झालं नेमकं बोलणं? VIDEO

Eknath Shinde Shows Concern For Sanjay Rauts Health: संजय राऊत यांच्या तब्येतीची एकनाथ शिंदे यांनी फोन करून विचारपूस केली. सुनील राऊत यांना फोन करून विचारपूस केली.
Eknath Shinde Shows Concern For Sanjay Rauts Health
Eknath Shinde Shows Concern For Sanjay Rauts HealthSaam
Published On
Summary
  • एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन

  • संजय राऊतांची केली विचारपूस

  • दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडली आहे. राऊत २ महिन्यांसाठी तब्येतीच्या कारणांमुळे सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार आहेत. २ महिन्यांसाठी ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणार आहेत. त्यानंतर नेते मंडळींनी राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांची विचारपूस केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी आज संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना फोन केला होता. त्यांनी सुनील राऊतांकडे संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शिंदेंनी फोन करून संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली. सध्या याफोनची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Eknath Shinde Shows Concern For Sanjay Rauts Health
निवडणुकीआधी ठाकरे गटाला झटका! माजी खासदारावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

एकनाथ शिंदे यांनी सुनील राऊत यांना फोन केल्यावर 'जर काही मदत लागली तर, नक्कीच आम्हाला फोन करा', असे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी सुनील राऊतांसोबत आपुलकीचा संवाद साधला. कट्टर विरोधक असूनही एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांची विचारपूस केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील जाहीर सभेतून संजय राऊतांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली.

तब्येतीच्या समस्येमुळे संजय राऊत यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रूग्णालयात असताना त्यांनी एक फोटो शेअर केला होता. पानावर लेखण आणि हातावर पेन 'लेखणीला थांबता कामा नये', असं म्हणत त्यांनी फोटो सोशल मीडियात शेअर केला होता. या फोटोवर अनेकांनी कमेंटद्वारे राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली.

Eknath Shinde Shows Concern For Sanjay Rauts Health
लग्नसराईत सोनं महागलं, चांदीच्या दरानंही उसळी घेतली; आज २४ कॅरेट १ तोळं सोन्याचा भाव किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com