

राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा धक्का बसला आहे
माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वडील शिवाजीराव कोकाटे यांचे निधन झालं
शिवाजीराव यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने प्राणज्योत मालवली
अजित पवारांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस शोकसागरात आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर राज्यातील विविध भागात शोकसभेचं आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दु:खात असताना माजी मंत्री, सिन्नर विधानसभेचे आमदार माणिकराव कोकाटे यांना पितृशोक झाला. त्यांचे वडील शिवाजीराव कोकाटे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. शिवाजीराव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
शिवाजीराव यांनी कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही काम पाहिलं आहे. अनेक वर्ष त्यांनी सहकार क्षेत्रात नेतृत्व केलं. मात्र, आज बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह तीन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंतिम यात्रा सोमठाणे येथून निघाली.
शिवाजीराव कोकाटे यांना अनेकांनी नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. आमदार विजयसिंह पंडित म्हणाले, 'माजी मंत्री, सिन्नर विधानसभेचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे वडील शिवाजीराव मुरलीधर कोकाटे यांचं निधन झाल्याची बातमी दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! कोकाटे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. मृतात्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना'.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, माजी मंत्री, सिन्नर विधानसभेचे आमदार माणिकराव कोकाटे यांना पितृशोक झाला. त्यांचे वडील शिवाजीराव कोकाटे (आप्पा) यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज सकाळी सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला. याप्रसंगी उपस्थित राहून त्यांचे अंत्यदर्शन घेतले व श्रद्धांजली अर्पण केली. दुःखदप्रसंगी कोकाटे कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.