शिवसेना ठाकरे गट पॉवरफुल्ल! अख्खी संघटना विलीन, दीडशे ते दोनशे पदाधिकाऱ्यांनी हाती घेतली मशाल
शेतकरी क्रांती संघटनेचा ठाकरे गटात अधिकृत विलीन.
गजानन बिलेवार आणि २०० पदाधिकारी शिवसेना (UBT) मध्ये दाखल.
उद्धव ठाकरे म्हणाले - "सगळी माणसं पैशाने विकली जात नाहीत".
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच दरम्यान, शिवसेना ठाकरे गट अधिक बळकट होत असल्याचं चित्र आहे. शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बिलेवार यांनी त्यांच्या संघटनेचा ठाकरे गटात विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत बिलेवार यांच्यासह १५० ते २०० पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन बांधत पक्षप्रवेश केला.
आज मातोश्रीवर शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बिलेवार यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ देण्याचं ठरवलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. १५० ते २०० पदाधिकाऱ्यांसह त्यांनी हाती शिवबंधन बांधलं. शेतकरी क्रांती संघटना ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन झाल्यामुळे उद्धव ठाकरेंनी आनंद व्यक्त केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंसह नेते अरविंद सावंतही उपस्थितीत होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'काही लोक शिवसेना संपवायला निघाले आहेत. पण तरीही शिवसेना पक्ष संपत का नाही, असा प्रश्न त्यांना पडतो. मी त्यांना सांगू इच्छितो, सगळी माणसं पैशानं विकली जात नाही. गद्दार पैशांनी विकले जाऊ शकतात. पंरतु, निष्ठावंत पैशानं विकले जाऊ शकत नाही', असे ठाकरे म्हणाले.
'अनपेक्षितपणे मला मुख्यमंत्रिपद स्वीकारावं लागलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनावेळी कोणत्याही शेतकऱ्यानं माझ्याकडे येऊन कर्जमु्क्त करा, अशी मागणी केली नव्हती. पण मला ही संधी मिळाली. शेतकरी जो अन्नदाता आहे, त्याचं आपण देणं लागतो. त्यामुळे मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न केला', असं ठाकरे म्हणाले.
शिंदेंची शिवसेना रस्त्यावर
दरम्यान, एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षप्रवेश होत असताना, दुसरीकडे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानाविरोधात शिंदेंच्या शिवसेनेनं उग्र आंदोलनाचा पवित्र घेतला. आज दादर येथे शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शायना एन. सी, मनिषा कायंदे आणि शीतल म्हात्रे यांच्यासह असंख्य शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.