बंडखोर खासदाराचं ठाकरेसेनेकडून पिंडदान, खासदार फुटले, शिवसैनिक संतापले, कुठे अंत्ययात्रा, तर कुठे जोडेमारो

Shiv Sena UBT workers protest against rebel MPs in Maharashtra: ठाकरेसेनेला मोठं खिंडार पडल्यानं फुटीर खासदारांविरोधात पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. संतप्त कार्यकर्त्यांनी बंडखोर खासदारांविरोधात थेट पिंडदान केलयं...त्यामुळे ठाकरेसेनेतील कार्यकर्ते खासदारांविरोधात कसं रानं उठवतायत... पाहूयातय..या स्पेशल रिपोर्टमधून...
Shiv Sena (UBT) workers perform symbolic last rites of rebel MPs during a protest in Maharashtra.
Shiv Sena (UBT) workers perform symbolic last rites of rebel MPs during a protest in Maharashtra.saam tv
Published On

पाहिलंत...ठाकरेसेनेतल्या बंडखोर खासदारांचं शिवसैनिकांनी थेट पिंडदानच केलंय. बंडखोर आमदार-खासदारांना रस्त्यावर तुडवा, अशी आक्रमक घोषणा संजय राऊतांनी दिल्यानंतर शिवसैनिक आता चांगलेच पेटून उठलाय. सोलापूरमध्ये शिवसैनिकांनी थेट बंडखोर सहा खासदारांचे फोटो लावून श्राद्ध घातलं.

विशेष म्हणजे श्राद्ध घातल्यानंतर जेवणाचा कार्यक्रमही आय़ोजित करण्यात आला आणि खासदारांच्या नावानं बोंबाबोंब करण्यात आली. सोलापूरातील गणपती घाटावर हा पिंडदानाचा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला... इतकंच काय तर 'स्वर्गात तरी सुखी राहा, तिकडे तरी गद्दारी करू नका, असा सल्लाच संतप्त शिवसैनिकांनी खासदारांना दिलाय... तर दुसरीकडे परभणीत खासदार संजय जाधवांच्या बंडखोरीनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी जाधवांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालत त्यांची अंत्ययात्रा काढलीय...

धुळ्यातही बंडखोर खासदारांच्या प्रतिमेला जोडे मारून शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केलाय.. दरम्यान भांडुपमध्ये ठाकरेसेनेनं खासदार संजय दिना पाटलांविरोधात आंदोलन केलं... खासदारांच्या फोटोवर फुल्ली मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.... महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी आमदारांचं बंड सर्वांनी पाहिलं...मात्र आता खासदारांची बंडखोरी कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलीय...पक्षाच्या चिन्हावर निवडून यायचे आणि नंतर पक्षाशीच गद्दारी करायची. या प्रवृत्तीविरुद्ध शिवसैनिकांचा संताप अनावर झालाय.. त्यामुळेच खासदारांचं श्राद्ध घालून ठाकरेसेनेनं आता ही लढाई केवळ राजकीय नसून, निष्ठा विरुद्ध गद्दारी अशी असल्याचं चित्र समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com