Maharashtra Politics: असा पक्षप्रमुख जगाच्या पाठीवर मी कधीच बघितला नाही, शिंदेंच्या बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर बाण

Political Turmoil in Konkan: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे आज शिवसेनेचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतला आहे.
ramdas kadam on uddhav thackrey
ramdas kadam on uddhav thackreySaam Tv
Published On

रत्नागिरी: संपूर्ण कोकणामध्ये उद्धव ठाकरेंचा एकेकाळी मोठा दबदबा होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंना कोकणातून मोठ्या राजकीय लाटांचा सामना करावा लागत आहे.उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकणात ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. ठाकरेंचे तीन टर्म राहिलेले आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्यासेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर माजी आमदार सुभास बने आणि गणपत कदम यांच्यासारख्या अनेक बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडचिठी दिली आहे.

ramdas kadam on uddhav thackrey
Devendra Fadanvis : दत्ता गाडेचा बदलापूरचा अक्षय शिंदे होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले...

त्यानंतर आज पुन्हा दापोलीत ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. दापोलीचे उपनगराध्यक्षासह सहा नगरसेवकांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे.शिवसेना नेते रामदास कदम आणि मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश दापोली येथे पार पडला.

ramdas kadam on uddhav thackrey
Ratnagiri News : रत्नागिरीत ठाकरे गटाला खिंडार, पाच नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार

रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

आपल्याच आमदाराला संपवण्याचा नीच विचार उद्धव ठाकरेंच्याच मनात येऊ शकतो. ठाकरे हे माझ्या मुलाला संपवायला निघाले होते. आता उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त केले नाही तर माझ नाव नाव रामदास कदम नाही अशी शपथ घेऊन त्यांनी ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. तसेच असा पक्षप्रमुख जगाच्या पाठीवर मी कधीच बघितला नाही. ते माझ्या मुलाला संपवायला निघाले होते. ज्या पद्धतीने त्याला संपविण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्हाला उठाव करण्याचा निर्णय घ्यावा लागला. असे ही ते म्हणाले.

ramdas kadam on uddhav thackrey
Maharashtra Politics: मातोश्रीवर राबणाऱ्यांपेक्षा गिफ्ट देणाऱ्यास तिकीट दिलं जायचं, मंत्री योगेश कदम यांचा खळबळजनक दावा

आता या महाराष्ट्रातून उद्ध्वस्त केलं नाही तर माझं नाव रामदास कदम नाही अशी शपथ ही त्यांनी यावेळी घेतली. उध्दव ठाकरेंना महाराष्ट्रातून संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असंही ते म्हणाले. रामदास कदम यांनी या आधी ही उद्धव ठाकरेंवर अशाच पद्धतीची टीका केली आहे. आपल्याला राजकारणातून उठवण्याचा डाव होता हा कदम हे नेहमीच आरोप करत आले आहे. तसेच आदित्य ठाकरे हे माझ्या पर्यावरण मंत्र्याच्या खुर्चीवर बसले असं ही कदम नेहमी सांगत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com