Maharashtra Politics: मातोश्रीवर राबणाऱ्यांपेक्षा गिफ्ट देणाऱ्यास तिकीट दिलं जायचं, मंत्री योगेश कदम यांचा खळबळजनक दावा

Ticket for Gifts Not Loyalty: राज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहे.

ठाकरे गटाच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की एक पद मिळते, असा सनसनाटी आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही शिवसेनेमध्ये मोठा वाद निर्माण झाला. या आरोपानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नीलम गोऱ्हे या निर्लज्ज आणि विश्वासघातकी आहेत, अशी टीका करत त्यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच गोऱ्हे यांनी तिकीट मिळवून देण्यासाठी पैसे घेतल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला. विशेषतः, नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोऱ्हेंना पैसे दिले होते, असा दावा त्यांनी केला आहे.

यावरून दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांनीही या वादात उडी घेत धक्कादायक विधान केले आहे.

योगेश कदम म्हणाले, लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीसाठी वेगवेगळे रेट कार्ड होते. पक्षासाठी राबणाऱ्या शिवसैनिकांना तिकीट न देता,ज्यांनी गिफ्ट दिले त्यांनाच उमेदवारी मिळायची. त्यामुळे अनेक निष्ठावान शिवसैनिक नाराज झाले आणि त्यांनी पक्ष सोडला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या आरोपांमुळे दोन्ही गटांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील काही दिवसांत यावर आणखी काय गौप्यस्पोट होतात हे बघण्याचे औत्सूक्यीचे ठरणार आहे.

Edited By Omkar Sonawane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com