Uddhav Thackeray Shivsena : विधानसभा निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर नेत्यांच्या आऊटगोईंगमुळं जोरदार झटका बसलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आता नवा डाव टाकला आहे. त्यामुळं राजकारणाच्या आखाड्यात मोठा ट्विस्ट येणार असल्याचे बोलले जाते. उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
ठाकरे गटाच्या बैठकीत विरोधी पक्षनेता कोण असावा याबाबत चर्चा सुरू होती. जवळपास तासभर या मुद्द्यावर चर्चा सुरू होती असे सांगितले जाते. विरोधी पक्षनेतेपदी कोण असावं, त्यांचे नाव तुम्ही सूचवा, असं उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित आमदारांना म्हणाले. विरोधी पक्षनेतेपदासाठी दोन नावे चर्चेत आहेत. त्या नावांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला तर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर याचा काही परिणाम होईल का, याबाबत देखील दोन्ही सभागृहातील आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.