Shivsena News : शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे कायम राहणार की नाही? 2 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी

Shivsena Party and Logo hearing in Supreme court : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी 2 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shiv Sena Hearing Supreme Court Live
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shiv Sena Hearing Supreme Court LiveSaam Tv
Published On

New Delhi :

शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय लवकरच लागण्याचा शक्यता आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. एकीकडे ही चर्चा सुरु असताना आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतच्या सुनावणीची देखील तारीख समोर आली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह  शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी 2 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shiv Sena Hearing Supreme Court Live
Talathi Bharati 2023: 'तलाठी भरती घोटाळ्याचा मास्टरमाईंड शोधा, अन्यथा...' ठाकरे गट आक्रमक; सरकारला इशारा

सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात हे प्रकरण लिस्टेड आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी झाली नव्हती. त्यामुळे दीर्घ कालावधीनंतर होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह या वादावर निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी 2023 रोजी निकाल दिला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने दिला होता. निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shiv Sena Hearing Supreme Court Live
Mla Nitin Deshmukh News : गावगुंडाविराेधात उबाठा शिवसेना आक्रमक, उद्या अकाेल्यात मूक मोर्चा

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल १० जानेवारीला येणार?

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी काहीच दिवसांपूर्वी पूर्ण झाली. या प्रकरणाचा निकाल येत्या १० जानेवारीला येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शिंदे गटाला दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सुरू असताना शिंदे गटाने शिवसेना एकच आहे, फक्त आम्ही शिवसेनेच्या नेतृत्वात बदल केल्याचा दावा केला होता. या मुद्द्यांचा आधारे शिंदे यांना दिलासा मिळू शकतो, असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com