परभणीत शिवसेना-राष्ट्रवादीच काही केल्या पटेना!

शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिघांपक्ष्यांची महाविकास आघाडी सरकार राज्यात सुरळीतपणे चालत आहे . मात्र परभणी त्या आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं दिसून येत आहे.
परभणीत शिवसेना-राष्ट्रवादीच काही केल्या पटेना!
परभणीत शिवसेना-राष्ट्रवादीच काही केल्या पटेना!Saam TV
Published On

परभणी : शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिघांपक्ष्यांची महाविकास आघाडी सरकार राज्यात सुरळीतपणे चालत आहे . मात्र परभणी त्या आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं दिसून येते आहे.परभणी शिवसेना खासदार संजय जाधव यांनी जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे कार्यकर्त्यांना संबोधित करतांना राष्ट्रवादी काँग्रेसला पायाखाली तुडवू असं विधान केला होता .त्यात जाधवांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर ही खालच्या भाषेत टीका केली होती.Shiv Sena-NCP disputes in Parbhani are not resolved

गेले अनेक दिवसांपासून परभणीचे खासदारParbhani Mp आणि राष्टवादी कॉंग्रेसNCP मध्ये कटूता आल्याच दिसत आहे जाधवांना नको असलेल्या परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोएलCollector Aanchal Goel यांचीच वर्णी पुन्हा परभणी शहरात लावल्याने हा वाद उदयास आला महत्वाची गोष्ट म्हणजे या जिल्हाधिकारी नकोत म्हणून मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोललो असताना देखील ही नियुक्ती झाल्यामुळे जाधवांच्या जिव्हारी घाव लागला म्हणायला हरकत नाही.

दरम्यान जाधवांनीSanjay jadhav भुजबळंवारchagan Bhujbhal केलेल्या टिकेचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खासदारांनी दिल्लीत माध्यमांशी बातचीत करताना दिलगिरी व्यक्त केली , तसेच मी कुठलाही गैर प्रकार करत नाही , जर काही गैर कृत्यात आढळलो तर राजकीय संन्यास घेण्याचं जाधवांनी सांगितलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसNCP या प्रकरणात भरपूर आक्रमक झालेली दिसून येते , राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनी खासदार जाधव यांच्यावर एका भूखंड प्रकरणात तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर प्रेशर टाकून चुकीचा फेर लावण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप केला आहे . आणि त्याचे पुरावे ही त्यांनी दाखवले आहे आता खासदारसाहेबांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामाResigned द्यायला हवा अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.

परभणीत शिवसेना-राष्ट्रवादीच काही केल्या पटेना!
शिवसेनेकडून भाजपचा निषेध; झेंडा काढण्यावरून आक्रमक

सोशल मीडिया वरही वाद-प्रतिवाद

दोन्ही पक्षांकडून एकमेकावर सोशल मीडियामार्फतSocial Media चिखलफेक केली जात आहे , राष्ट्रवादी च्या अधिकृत फेसबुक पेज वरून खासदारांविरोधात अनेक पोस्ट केल्या गेल्या आहेत, त्यामुळे राज्यात जरी महा विकास आघाडीचे सरकार सुरळीतपणे चालत असली तरी परभणी जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडी मध्ये बिघाडी झाल्याचं दिसून येते . येणाऱ्या दिवसात ही कटुता आणखी किती खोल जाईल ते सांगता येण कठीण आहे

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com