Uddhav Thackeray To Visit Barsu Today : 'नितेश राणे कोण लागून गेला, बघितलं तर...'

बारसू प्रकल्पाचा अभ्यास व्हायला हवा असे अंबादास दानवे यांनी नमूद केले.
barsu refinery project, barsu refinery, nitesh rane, ambadas danve,
barsu refinery project, barsu refinery, nitesh rane, ambadas danve, saam tv
Published On

- विनायक वंजारे

Ambadas Danve News : आमदार नितेश राणे कोण लागून गेलाय की त्याची दखल शिवसेनेने घ्यावी. तो एका मतदार संघाचा साधा आमदार आहे अशी खिल्ली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना उडवली. दरम्यान आज (शनिवार) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे नेते राज ठाकरे तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी दाै-यावर असल्याने पाेलिस प्रशासनावर कायदा व सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी माेठा ताण असल्याचे दिसून येत आहे. (Maharashtra News)

barsu refinery project, barsu refinery, nitesh rane, ambadas danve,
Deepak Kesarkar News : जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचे स्वप्न पूर्ण हाेणार ? शिक्षणमंत्र्यांकडून महत्त्वपूर्ण घाेषणा

कोकणातील राजापूर बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. काही ग्रामस्थांचा याला विरोध आहे. याच ग्रामस्थांची भेट घेण्याकरता उद्धव ठाकरे बारसू (uddhav thackeray visit to barsu) येथे आज येणार आहेत. त्याची माहिती अंबादास दानवे यांनी माध्यमांना दिली.

barsu refinery project, barsu refinery, nitesh rane, ambadas danve,
Vinayak Raut News : त्यांच्या गमजा, लाचारी, भाजपनं केवळ भुंकण्यासाठी पाळलं; राणेंचा बाजार उठवणार : विनायक राऊत

दानवे म्हणाले बारसू रिफायनरीबाबत शेतकरी, गावकऱ्यांची भूमिका जाणून न घेता आंदोलन दाबण्याचा प्रकार सरकारकडून सुरू आहे. विरोध समजून न घेता अत्याचार करणे, पोलीस बळाचा वापर करणे चूकीचे असून सरकारची कारवाई हुकूमशाही, बेबंदशाहीची आहे.

प्रकल्प रोजगार देणारा की उद्योजक, व्यापारी, गुंतवणूकादारांच्या फायद्याचा आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे याचा अभ्यास व्हायला हवा असेही दानवे यांनी नमूद केले.

barsu refinery project, barsu refinery, nitesh rane, ambadas danve,
Devendra Fadnavis In Belgaum : बेळगावत देवेंद्र फडणवीसांना दाखविले काळे झेंडे; महाराष्ट्र एकीकरण समिती अन् पाेलिसांची झटापट (पाहा व्हिडिओ)

त्यामुळेच या प्रकल्पाला विरोध असलेल्या जनतेची भावना समजून घेण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बारसूला येत असल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

आमदार नितेश राणे हे रोज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत व शिवसेनेवर टीका करत असताना शिवसेनेकडून त्यांना प्रत्युत्तर दिल जात नाही या माध्यमांच्या प्रश्नावर दानवेंनी नितेश राणेंची अशी खिल्ली उडवली. ते म्हणाले नितेश राणे कोण लागून गेलाय की त्याची दखल शिवसेनेने घ्यावी. तो एका मतदार संघाचा साधा आमदार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com