Abdul Sattar : अर्र... शिवसेनेच्या 'वाघाला' राष्ट्रीय प्राणीच माहीत नाही, अब्दुल सत्तारांचा VIDEO होतोय व्हायरल

Abdul Sattar Viral Video : शिवसेनेच्या या 'वाघाने' यावेळी चक्क बिबट्यालाच राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलंय.
अर्र... शिवसेनेच्या 'वाघाला' राष्ट्रीय प्राणीच माहीत नाही, अब्दुल सत्तारांचा VIDEO होतोय व्हायरल
Abdul Sattar Viral Video Saam TV
Published On

छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या बिबट्याने चांगलीच दहशत माजवली आहे. गेल्या १४ दिवसांपासून हा बिबट्या शहरात लपून बसलाय. नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी या बिबट्याचा सातत्याने शोध घेत आहे. मात्र, तरी देखील त्यांना बिबट्या हुलकावणी देत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.

अर्र... शिवसेनेच्या 'वाघाला' राष्ट्रीय प्राणीच माहीत नाही, अब्दुल सत्तारांचा VIDEO होतोय व्हायरल
Maharashtra Politics : अजितदादांचा आणखी एक आमदार फुटणार? शरद पवारांची कोण करतंय मनधरणी?

अशातच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत मंत्री सत्तार हे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना देताना दिसून येताहेत.

शहरात लपून बसलेल्या बिबट्याला (Leopard) तातडीने शोधा आणि त्याला जंगलात सोडा, असे अब्दुल सत्तार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, शिवसेनेच्या या 'वाघाने' यावेळी चक्क बिबट्यालाच राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलंय.

"बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असून त्याचं संरक्षण आपल्याला केलं पाहिजे. वन विभाग तसा प्रयत्न करत आहे," असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय.

स्वत:ला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणणाऱ्या अब्दुल सत्तार यांना राष्ट्रीय प्राणी कोणता हे माहिती नाहीये का? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करीत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून सत्तार यांना टार्गेट केलंय. तर काहींनी बोलण्यात चूक झाली, त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातोय, असं म्हणत सत्तारांची पाठराखण केली आहे.

अर्र... शिवसेनेच्या 'वाघाला' राष्ट्रीय प्राणीच माहीत नाही, अब्दुल सत्तारांचा VIDEO होतोय व्हायरल
NCP MLA Disqualification: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेची आज सुनावणी; विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलणार का? सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com