Shirdi Saibaba Temple : शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानाचं दुसऱ्यांदा मोठं पाऊल; निर्णयाची अंमलबजावणी उद्याच होणार

Shirdi Saibaba Temple update : शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानाचं दुसऱ्यांदा मोठं पाऊल उचललं आहे. या निर्णयाची उद्यापासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
Shirdi Saibaba Mandir
Shirdi Saibaba MandirSaam tv
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही

शिर्डी : गेल्या काही दिवसांमध्ये शिर्डीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी परिसरात खळबळ उडाली होती. शिर्डी संस्थानाच्या या दोन कर्मचाऱ्यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर शिर्डी संस्थानाने कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल केला होता. त्यानंतर आता शिर्डी संस्थानाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

Shirdi Saibaba Mandir
Shirdi Airport : शिर्डी विमानतळ परिसरात लेझर प्रकाश किरण वापरास बंदी; वैमानिकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने आदेश

देशातील कोट्यवधी साई भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डी मंदिराच्या संस्थानाने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानाने हा निर्णय घेतला आहे. आता शिर्डीतील साई मंदिरात दर्शन रांगेसह संस्थानाच्या भक्त निवासात मोफत भोजन कूपन दिले जाणार आहेत. यापूर्वी मोफत जेवणासाठी साई संस्थानच्या प्रसादालयात थेट प्रवेश होता.

शिर्डी मंदिरातील मोफत भोजनासाठी थेट प्रवेशामुळे शिर्डीत भिक्षेकरी आणि गुन्हेगार वाढल्याचा मुद्दा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला होता. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

Shirdi Saibaba Mandir
Shirdi crime news: दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली, साई संस्थानच्या २ कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला

मोफत भोजनावरून पिता-पुत्रांची वेगवेगळी भूमिका

साई संस्थानच्या प्रसादालायातील मोफत भोजनावरून विखे पिता-पुत्रांची वेगवेगळी भूमिका घेतली आहे. मंदिरातील मोफत भोजन बंद करून साईभक्तांकडून शुल्क आकारा, असं माजी खासदार सुजय विखे पाटील यांचं म्हणणं आहे. तर साईभक्तांना प्रसाद भोजन नि:शुल्क सुरुच राहील, असं वडील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं म्हणणं आहे.

Shirdi Saibaba Mandir
Shirdi Murder News: शिर्डी दुहेरी हत्याकांड; थरारक हत्येचं दुसरं CCTV फुटेज समोर, अंगावर काटा आणणारा Video पाहा

पुत्राच्या वेगळ्या भूमिकेवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. सुजय विखेंच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शिर्डीत भिक्षेकऱ्यांचा प्रश्न गंभीर असल्याचं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com