Shirdi: शिर्डी साई संस्थानकडून दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर
Shirdi: शिर्डी साई संस्थानकडून दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीरगोविंद साळुंके

Shirdi: शिर्डी साई संस्थानकडून दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर

शिर्डीतील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबांचे समाधी मंदिर 7 तारखेला दर्शनासाठी खुले होणार आहे.
Published on

गोविंद साळुंके

शिर्डी : शिर्डीतील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबांचे समाधी मंदिर 7 तारखेला दर्शनासाठी खुले होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थांनी नियमावली जाहीर केली आहे. दररोज 15 हजार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये 5 हजार फ्री ऑनलाईन पद्धतीने 5 हजार ऑफलाईन पद्धतीने (बायोमेट्रिक) तर 5 हजार पासेस सशुल्क पद्धतीने देण्यात येणार आहे.

हे देखील पहा-

10 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, तसेच 65 वर्षा वरील व्यक्ती व आजारी व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही याशिवाय मंदिरात फुल हार इतर पूजेचे साहित्य नेण्यास मनाई आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी सुरुवातीचे काही दिवस दर गुरुवारी निघणारी पालखी बंद राहणार आहे. तर प्रत्येक तासाला 1150 साई भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. साई भक्तांना दर्शनाकरिता online.Sai.org in या संकेतस्थळावरून ऑनलाईन दर्शन पासेसेची बुकिंग करावी लागणार आहे.

Shirdi: शिर्डी साई संस्थानकडून दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर
योगी सरकारकडून सत्तेचा गैरवापर- शरद पवार

दर्शन रांगेमध्ये दोन भाविकांमध्ये 6 फुटाचे अंतर राहील भाविकांच्या चेहऱ्याला माक्स हे बंधनकारक राहणार आहे. मंदिर व मंदिर परिसरामध्ये सॅनिटायझर चाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांनी दिली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com