शिर्डीतून (Shirdi) साईभक्तांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. शिर्डीच्या साई मंदिरातील मूर्तीची दिवसेंदिवस झीज होत आहे. याप्रकरणी तज्ञांनी मोठा दावा व्यक्त केला आहे. तज्ञ काय म्हणतात, हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Marathi News)
साईबाबांच्या (Shirdi Sai Baba) मूर्तीची झीज होत आहे. काळजी न घेतल्यास भविष्यात मुर्ती गुळगुळीत होण्याची शक्यता देखील मुर्तीतज्ञांनी व्यक्त केली आहे. समाधी मंदिरात साई मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 1954 साली करण्यात आली होती. ही मूर्ती इटालियन मार्बलची आहे. इटालियन मार्बलची ही मूर्ती दिवसेंदिवस झिजत असल्याचा तज्ञांनी दावा केला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
साईमूर्तीची होतेय झीज
मूर्तीचं थ्रीडी स्कॅनिंग करून मूर्तीचा डाटा संरक्षित करण्याची गरज असल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे. मूर्तीची (Sai Baba Idol Erosion) झीज रोखण्यासाठी साई संस्थानने पाऊले उचलणं गरजेचं आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. या मूर्तीचा डाटा अत्याधुनिक थ्रीडी स्कॅनिंगद्वारे संरक्षित केला तर पुढच्या पिढ्यांना किमान आज दिसते तशी साईमूर्ती बघता येईल, असं मूर्तीतज्ञ म्हणत आहेत.
मूर्तीच्या दाढी, हातापायांची नखे, मिशांचे केस यामध्ये आता सध्याच झिज झाली आहे. या मूर्तीची काळजी घेतली नाही, तर भविष्यात ही मूर्ती (Sai Baba Idol) गुळगुळीत होण्याची भीती पंचविसाव्या वर्धापनदिनीच व्यक्त केली गेली होती. त्यानंतर संस्थानने मूर्तीच्या स्नानासाठी अतिगरम पाणी, दही-दुधाचा वापर कमी केला होता.
मूर्तीचं थ्रीडी स्कॅनिंग
मूर्ती इटालियन मार्बलची आहे. मार्बल नैसर्गिकदृष्ट्या थंड असल्यानं गरम पाण्यानं ती ठिसूळ होते. दही-दुधात असलेल्या आम्लाचाही मूर्तीवर विपरीत परिणाम होतो. याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. साईभक्तांसाठी हा फार जिव्हाळ्याचा विषय (Shirdi News) आहे.
प्रत्येक मूर्ती किंवा वस्तूचं एक ठराविक आयुष्य असतं. कालांतराने मूर्तीची झीज होते किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे तुटफूट झाल्यास तिचं सौंदर्य कमी होते. या पार्श्वभूमीवर मूर्तीचं थ्रीडी स्कॅनिंग करून मूर्तीचा डाटा संरक्षित करता येतो. भविष्यात मूर्ती बदलायची ठरली, तर या डाटाचा वापर करून हुबेहूब दिसणारी मूर्ती कोणत्याही बनवता येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.