Shirdi Sai Baba: शिर्डी साईबाबांना २९ लाखांचा सोन्याचा मुकुट दान; बेंगलोरमधील भक्ताची साईचरणी अनोखी गुरुदक्षिणा!

Sai Baba Temple News: आज (मंगळवार, ९ जानेवारी) बेंगलोरमधील (Banglore) राजाराम कोटा यांच्या परिवाराने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी कोटा परिवाराने तब्बल 29 लाख रूपये किमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबा चरणी अर्पण केला.
Sai Baba Temple News
Sai Baba Temple NewsSaamtv
Published On

सचिन बनसोडे, अहमदनगर|ता. ९ जानेवारी २०२४

Shirdi Sai Baba News:

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला नेहमीच भक्तांची गर्दी पाहायला मिळते. देशविदेशातून असंख्य भक्त साईचरणी लीन होण्यासाठी येत असतात. साईचरणी लीन झालेला भक्त आपापल्या परीने वस्तू किंवा रोख रकमेचे दान देत असतो. अशातच एका बँगलोरमधील भक्ताने तब्बल २९ लाखांचा सोन्याचा मुकुट साईचरणी दान केला आहे.

शिर्डी साई बाबांच्या (Sai Baba) दर्शनाला दररोज हजारो भाविक येत असतात. यामधील बहुतेक भाविक हे रोख स्वरुपात किंवा सोने- चांदीच्या स्वरुपात मोठे दान देत असतात. आज (मंगळवार, ९ जानेवारी) बेंगलोरमधील (Bengaluru) राजाराम कोटा यांच्या परिवाराने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले.

यावेळी कोटा परिवाराकडून तब्बल 29 लाख रूपये किमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबा चरणी अर्पण करण्यात आला. कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवले यांच्याकडे हा मुकूट सुपूर्द करण्यात आला. आज साईंच्या मुर्तीवर हा मुकूट चढवण्यात आला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sai Baba Temple News
Nashik Crime: नाशिकला दर्शनासाठी आलेल्या कर्नाटकच्या महिलेची सोन्याची पोत लांबविली; आरोपी ४६ ग्रॅम सोन्यासह ताब्यात

दरम्यान, नववर्षाच्या स्वागतालाही साईभक्तांनी शिर्डीमध्ये गर्दी केली होती. याकाळात शिर्डी देवस्थानकडून शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीमध्ये २३ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान आठ लाख भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच याकाळात भक्तांनी तब्बल १६ कोटींचे दानही साईचरणी अर्पण केले. (Latest Marathi News)

Sai Baba Temple News
Dhule : देवेंद्र फडणवीसांपासून सावध राहा, माजी आमदारांचा अजित पवार, छगन भुजबळांना सल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com