उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) व ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी सावध राहावे असा सल्ला धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे (anil gote) यांनी दिला आहे. गाेटे यांनी एका परिपत्रकाच्या माध्यमातून हा सल्ला दिला आहे. (Maharashtra News)
गाेटे म्हणाले मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जरांगे पाटील यांच्यातर्फे मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईला मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात जरांगे यांनी मराठा समाजबांधवांना केलेल्या आवाहनानंतर भाजपने काेणतीच कुठल्याही प्रकारची ठोस प्रतिक्रिया दिली नाही.
फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्यातर्फेच मराठा आरक्षणासंदर्भात विधाने केली जात आहेत. यामुळे याचा परिणाम आगामी काळात या दोन्ही नेत्यांच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भाजपतर्फे इतर राष्ट्रीय पक्ष संपविण्याचे कटकारस्थान केले जात असल्याने या दोन्ही नेत्यांनी सावध राहावे असा सल्ला गोटे यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.