Sai Baba Mandir Drone Video: शिर्डीच्या साई मंदिर परिसरात ड्रोन उडवणं पडलं महागात; प्रसिद्ध रील स्टारविरोधात गुन्हा

Reels Star News: तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाताच शिर्डी पोलिसांकडून तात्काळ देव दोडियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Sai Baba Mandir Drone Video
Sai Baba Mandir Drone VideoSaam TV
Published On

Shirdi News:

शिर्डी साई मंदिर परिसरात ड्रोन उडवणं एका युवकाला चांगलंच महागात पडलं आहे.ड्रोन कॅमेऱ्यातील रील व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर हा प्रकार समोर आला. साई मंदिर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी असताना मुंबईच्या रील स्टारने ड्रोन उडवल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sai Baba Mandir Drone Video
Haldi Dance Video: मागणी पळवून लावण्यासाठी वरातीत करवलीचा धिंगाणा; डान्स पाहून पाहुणे टकमक पाहतच राहिले

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाताच शिर्डी पोलिसांकडून तात्काळ संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. देव दोडिया असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. मुंबईत त्याच्याविरोधात कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

साईमंदिर परिसरात एक किलोमीटरपर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी आहे. मात्र तरीही या तरुणाने फोटोग्राफीसाठी ड्रोन कॅमेरा उडवला आणि @devdxb या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. कारवाईनंतर हा व्हिडीओ आता डिलेट करण्यात आला आहे.

साईबाबा मंदिर आणि परिसरात एक किलोमीटरपर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी असताना देखील श्री साईबाबा मंदिरावरती ड्रोन उडवण्यात आला. तसेच गेट क्रमांक चार समोरील श्री साईबाबा पुतळ्याचे आणि मंदिराचे ड्रोनद्वारे शूटिंग घेऊन इंस्टाग्रामवर रील्स सोशल मीडियावर टाकून आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आलीये.

देव दोडिया हा तरुण एक रील स्टार तसेच मोठा साई भक्त आहे. त्याच्या इंस्टाग्रम अकाऊंटवर साईबाबांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यात आलेत. आपल्या फोटोग्राफीच्या कलेने त्याने जगातील अनेक भन्नाट धार्मिक गोष्टी आपल्या फोनमध्ये कैद केल्यात.

Sai Baba Mandir Drone Video
Nashik News: मद्यधुंद तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा; तलवार नाचवत दुकानाच्या काचा फोडल्या, धक्कादायक घटनेचा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com