Nashik News: मद्यधुंद तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा; तलवार नाचवत दुकानाच्या काचा फोडल्या, धक्कादायक घटनेचा VIDEO

Nashik Crime News: नाशिक शहरातील दामोदर चौक परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणाने चांगलाच धिंगाणा घातला.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam TV
Published On

Nashik Latest News

नाशिक शहरातील दामोदर चौक परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणाने चांगलाच धिंगाणा घातला. हातात तलवार घेऊन या तरुणाने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. संताजपनक बाब म्हणजे या तरुणाची मुजोरी इतकी वाढली, की त्याने एका गर्भवती महिलेला धक्का देऊन खाली पाडलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik Crime News
IMD Rain Alert: पुढील २४ तासांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार; या राज्यांना झोडपून काढणार, हवामान खात्याचा अंदाज

इतक्यावरच न थांबता त्याने परिसरातील दुकानांची देखील तोडफोड केली. या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत तरुणाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी वेळीच धाव घेत या मद्यपी तरुणाला ताब्यात घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. हा संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दामोदर चौक हा शहरातील गजबजलेला परिसर आहे. नेहमी याठिकाणी नागरिकांची गर्दी असते.

अशातच सोमवारी सायंकाळच्या सुमारास एक मद्यपी तरुण चौकात आला. त्याने भररस्त्यात तलवार नाचवत दहशत माजवली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना तलवारीचा धाव दाखवत परिसरातील दुकानांची तोडफोड केली.

याचवेळी समोरून येत असलेल्या एका गर्भवती महिलेला या तरुणाने धक्का देत खाली पाडले. सुदैवाने यात महिलेला कुठलीही दुखापत झाली नाही. दरम्यान हा सर्व प्रकार सुरू कुणीही या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. मद्यपी तरुण पाथर्डी येथील असल्याचे समजते.

Nashik Crime News
Horoscope Today: शनी-चंद्राच्या संयोगामुळे अशुभ योग; या राशींच्या व्यक्तींवर येणार मोठं संकट!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com