Shirdi News: शिर्डीत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय, छापा टाकताच तरुणांसह महिला आक्षेपार्ह स्थितीत सापडल्या

Prostitution Business In Hotel At Shirdi: शिर्डीमध्ये हॉटेलवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी महिला आणि तरुणांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं.
Shirdi News: शिर्डीत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय, छापा टाकताच तरुणांसह महिला आक्षेपार्ह स्थितीत सापडल्या
Prostitution business in hotelSaam Tv
Published On

सचिन बनसोडे, शिर्डी

शिर्डीतील पालखी मार्गावर असणाऱ्या काही हॉटेल्समध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी दोन हॉटेलवर छापा टाकून दोन तरुणांसह ४ महिलांना ताब्यात घेण्यात आलं. तर हॉटेल मालक आणि दोन मॅनेजर यांच्यावर पिटाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीतील अवैध गुन्हेगारी आणि वेश्या व्यवसाय मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. साईबाबांची पालखी ज्या मार्गाने जाते त्या मार्गावरील हॉटेल सावता आणि हॉटेल बारकाबाई गेस्ट हाऊसवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला.

Shirdi News: शिर्डीत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय, छापा टाकताच तरुणांसह महिला आक्षेपार्ह स्थितीत सापडल्या
Shirdi : धमकीच्या मेलनंतर साई संस्थान अलर्ट; दर्शनरांग प्रवेशद्वारावर कसून तपासणी

वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मइळताच उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने आणि पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या पथकांनी एकाच वेळी दोन्ही हॉटेल्सवर छापा टाकला. यावेळी काही महिला आणि तरुण आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले. या कारवाईत चार महिला आणि दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात दोन्ही हॉटेल मालक आणि मॅनेजर अशा एकूण चार व्यक्तींवर पिटाअंतर्गत कारवाई करण्यात आली.

Shirdi News: शिर्डीत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय, छापा टाकताच तरुणांसह महिला आक्षेपार्ह स्थितीत सापडल्या
Shirdi Sai Sansthan : साई चरणी भरभरून दान; ५१४ किलो सोने आणि ६६०० किलो चांदी, दागिने ठेवण्याबाबत संस्थानने काय सांगितले वाचा

शिर्डी शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देह विक्री व्यवसाय चालत असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांकडे केलेल्या होत्या. देहविक्री व्यवसायामुळे शिर्डीतील स्थानिक नागरिक हैराण झाले होते. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी यापूर्वीही अशाप्रकारच्या कारवाया केल्या होत्या. मात्र आता थेट हॉटेल मालकांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Shirdi News: शिर्डीत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय, छापा टाकताच तरुणांसह महिला आक्षेपार्ह स्थितीत सापडल्या
Shirdi Sai Baba: साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचा प्रताप, दान पेटीतून लाखोंची रक्कम लंपास; CCTV व्हिडिओतून सत्य समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com