Shirdi Airport : कुंभ मेळ्यासाठी शिर्डी विमानतळ ठरणार केंद्रबिंदू; विमानतळावर नाईट लँडिंग सुरू

Shirdi Airport News : कुंभ मेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार असल्याचं भाकीत सुजय विखे पाटील यांनी दिलं आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू झाली आहे.
Shirdi Airport
Shirdi Airport News : Saam tv
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही

अहिल्यानगर : शिर्डी विमानतळावर आजपासून नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली आहे. 60 प्रवाशांना घेऊन हैदराबाद येथून पहिलेच विमान साडेनऊ वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल झालंय. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीत दाखल झालेल्या प्रवाशांचे फुल आणि साईबाबांचा बुंदी प्रसाद देऊन तसेच केक कापून स्वागत केलंय.

2018 साली शिर्डीत विमानतळ सुरू झाल्यानंतर आजतागायत हजारो प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतलंय. शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओढा लक्षात घेता नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती.

Shirdi Airport
kalyan railway station : कल्याण रेल्वे स्टेशनने थकवलंय पाणी बिलाचे ४ कोटी; KDMCकडून कनेक्शन कट

अखेर आजपासून नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्याने साईभक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. ही सुविधा सुरू होताच शिर्डी विमानतळावर पहिल्याच विमानाने येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत पुष्प, साईबाबांचा प्रसाद देऊन तसेच केक कापून करण्यात आले.

नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभ मेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार आहे.. याठिकाणी जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यासह विमानसंख्या वाढवण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया यावेळी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी दिलीये.

Shirdi Airport
Himachal Landslide : हिमाचलच्या मणिकर्णमध्ये भूस्खलन, ६ लोकांचा जागीच मृत्यू

शिर्डीला येणाऱ्या भाविकांना विमा

शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे अपघात होतात. या अपघातात अनेकांचा जीव जातो. त्यामुळे भक्तांच्या सुरक्षेसाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने भक्तांसाठी पाच लाखांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी संस्थानाने एका कंपनीशी करार केला आहे. त्यासाठी हप्ताही कंपनीकडे जमा करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com