Shirdi Sai Sansthan : साईभक्तांसाठी साई संस्थानचा मोठा निर्णय; पाच लाखापर्यंतचे विमा संरक्षण

Shirdi News : शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. मात्र बऱ्याचदा दर्शन घेण्यासाठी येत असताना किंवा दर्शन घेऊन परतताना काही दुर्घटना घडत असतात
Shirdi Sai Sansthan
Shirdi Sai SansthanSaam tv
Published On

सचिन बनसोडे 
शिर्डी (अहिल्यानगर)
: शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यामुळे वर्षभर येथे भाविकांची मोठी गर्दी असते. या अनुषंगाने साई दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. साई संस्थानने साईभक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. येथे येणाऱ्या भाविकांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. मात्र बऱ्याचदा दर्शन घेण्यासाठी येत असताना किंवा दर्शन घेऊन परतताना काही दुर्घटना घडत असतात. याच अनुषंगाने साई संस्थानने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यात भाविकांना सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात येथे येणाऱ्या भाविकांसाठी हि आनंदाची बातमी आहे. 

Shirdi Sai Sansthan
Gudi Padwa: तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गुढीपाडवा परंपरेनुसार साजरा, मंदीराच्या शिखरावर उभारली गुढी

वेबसाईटवर नोंदणी करणे बंधनकारक 

साई बाबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विमा संरक्षण देण्याचा मोठा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. मात्र साईभक्तांनी दर्शनाला येण्याआगोदर साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करणे बंधनकारक आहे. यामुळे घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन करेपर्यंत काही अप्रिय घटना घडली, तर पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण संबंधिताला किंवा त्याच्या कुटुंबियांना मिळणार आहे. 

Shirdi Sai Sansthan
Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरसाठी 'यंदाचा गुढी पाडवा आहे खास', नेमकं कारण काय?

साई मंदिरावर उभारली श्रद्धा सबुरीची गुढी

साईबाबांच्या शिर्डीतही गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा उत्साह दिसून येत आहे. साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून ही गुढी उभारली. आज मराठी नववर्षाचे स्वागतही मोठ्या उत्साहात पार पडत असून साई भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. आज साईबाबांच्या मुर्तीला कोट्यावधी रूपयांच्या आभुषणांसह साखरेच्या गाठीची माळ परिधान करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com