Gudi Padwa: तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गुढीपाडवा परंपरेनुसार साजरा, मंदीराच्या शिखरावर उभारली गुढी

Gudi Padwa Tuljabhavani Temple: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला आहे.
Tuljabhavani Mandir
Tuljabhavani MandirSaam TV
Published On

आज गुढीपाडवा! राज्यभरात मोठ्या उत्साहात मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात येत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातही हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व असल्याने देवीला शिवकालीन दागिने परिधान करून अलंकार पूजा करण्यात आली. तसेच, दुष्काळाचे संकट टळावे यासाठी विशेष साकडेही घालण्यात आले.

तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर गुढी

देवीची पहाटे ४ वाजता आरती करून तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर विधीवत पुजा करण्यात आली. तसेच वेगवेगळ्या साडीची गुढी उभारण्यात आली आहे. तसेच त्याला भगवा ध्वजही लावण्यात आला आहे. तुळजापूर मंदीरावर गूढी उभारण्यात आल्यानंतर तुळजापूर शहरातील ग्रामस्थ घरांमध्ये गुढी उभी करतात.

Tuljabhavani Mandir
Buldhana News: 'माझ्या जीवाला धोका', कुऱ्हाड घेतली अन् काकाच्या डोक्यातच घातली, पुतण्याचा प्रताप

दरम्यान, पुढच्या वर्षीची गुढी ही मंदीराच्या शिखरावर उभी राहु दे, अशी प्रार्थनाही गुढीसमोर महंतानी केली आहे. तसेच, तुळजाभवानी मातेचे मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा,वाकोजी बुवा यासह पुजारी भक्तांच्या उपस्थितीत गुढी उभारण्यात आली. यासह देवीला साखरेचा हार अर्पण करण्यात आला आहे.

Tuljabhavani Mandir
Pune News: 'तुझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी..' पती नंपुसक, पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी मित्राला घरी बोलवलं अन् मग

खरंतर, रामराज्यापासून गुढी उभारण्याची तुळजापूरमध्ये परंपरा आहे. सर्वात आधी तुळजाभवानी मंदीराच्या कळसावर गुढी उभारण्यात येते. त्यानंतर गावातील प्रत्येक घरात गुढी उभारली जाते. गुढीपाडव्यानिमित्त देवीला खास शिवकालीन अलंकार घातले जातात. यावेळी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com