"पक्षाला नाट लागलं, छटाकभर गावात २-२ दुकाने!"; शिंदेंच्या आमदाराचा पक्षालाच घरचा आहेर; राजकीय वर्तुळात खळबळ

Chandrakant Raghuvanshi : शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्षातील गटबाजीवरून नाराजी व्यक्त केली आहे. 'छटाकभर गावात २-२ दुकाने' आणि 'पक्षाला नाट लागलं' असे म्हणत त्यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. नंदुरबार-धुळे पट्ट्यातील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
Chandrakant Raghuvanshi statement on Shinde Sena groupism
Shinde MLA
Published On

सागर निकवाडे, नंदुरबार प्रतिनिधी

Chandrakant Raghuvanshi statement on Shinde Sena groupism : सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षातील अंतर्गत मतभेद आणि गटबाजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आणि उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी स्थानिक पातळीवरील गटबाजीवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. चंद्रकांत रघुवंशी यांच्या या विधानामुळे उत्तर महाराष्ट्रात, नंदुरबार आणि धुळे पट्ट्यात, शिंदे गटात सुरू असलेला सत्तासंघर्ष आणि अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.

"छटाकभर गावात दोन-दोन दुकाने"

आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी अत्यंत कठोर शब्दांत आपली खंत व्यक्त केली. "शिवसेनेला अंतर्गत गटबाजीची नाट लागली आहे. अगदी छटाकभर गावातही पक्षाचे दोन-दोन गट आणि दुकाने थाटली गेली आहेत," अशी उघड कबुली त्यांनी दिली. पक्षात सुरू असलेल्या या अंतर्गत कुरघोडीमुळे संघटनेचे मोठे नुकसान होत असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

Chandrakant Raghuvanshi statement on Shinde Sena groupism
बापाने मुलाला घरातून हाकलण्यासाठी लावली पूर्ण ताकद, पण हायकोर्टाने एकाच वाक्यात गेमच उलटवला, वाचा नेमकं काय झालं?

संपर्कप्रमुखांना कडक शिस्तीचा सल्ला

शिवसेना पक्षाचे संपर्कप्रमुख शिरीष चौधरी यांना त्यांनी सल्ला दिला. ते रघुवंशी म्हणाले की, स्थानिक पातळीवरील गटबाजी मोडून काढण्यासाठी आता मवाळ भूमिका घेऊन चालणार नाही. कार्यकर्त्यांना प्रसंगी दम भरून, शिस्त लावून सर्वांना एकत्र काम करायला भाग पाडले पाहिजे.

Chandrakant Raghuvanshi statement on Shinde Sena groupism
Redevelopment : पुनर्विकासात नवीन घर मिळणार? मग जाणून घ्याच! 'त्या' निर्णयामुळे हजारो फ्लॅटधारकांना लाखो रुपयांचा फायदा

उत्तर महाराष्ट्रात अंतर्गत वाद चव्हाट्यावर

चंद्रकांत रघुवंशी यांच्या या विधानामुळे उत्तर महाराष्ट्रातील (विशेषतः नंदुरबार आणि धुळे पट्ट्यात) शिंदे गटात सुरू असलेला सत्तासंघर्ष आणि अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षात जुने आणि नव्याने दाखल झालेले कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधण्यात स्थानिक नेतृत्व अपयशी ठरत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद व पंचायत समिती) निवडणुका तोंडावर असताना, पक्षातील ही उघड फाटाफूट शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे आता पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com