मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

MP Sanjay Patil: शिंदे गटाच्या खासदाराने पत्रकारांला धमकी दिल्याने वाद निर्माण झाला आहे. या घटनेमुळे प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य, पत्रकारांची सुरक्षा आणि संभाव्य राजकीय कारवाई यांबाबत चर्चा सुरू झाली आहे.
मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?
Published On

महाराष्ट्रात पत्रकारांचा जीव धोक्यात आहे. होय मुंबईतील शिंदेच्या खासदारामुळे पत्रकारांना धोका निर्माण झालाय. स्वता 12 -15 पोलिसांच्या संरक्षणात फिरणाऱ्या खासदारांना पत्रकारांच्या प्रश्नांची धडकी भरलीये. आणि म्हणूनच प्रश्न विचारायला आलात तर मारण्याची धमकी देणाऱ्या या मुजोर खासदाराची मुजोरी कॅमेऱ्यात कैद झालीये. पाहूया एक खास रिपोर्ट

मी विसरुन जाईन मी खासदार आहे

रिकॉर्ड कर.. XXXX डोक्यात जाऊ नका

आता परत आले तर मारुन पाठवणार

जे लिहायचं ते लिहा..

रेकॉर्ड करा कमिशनरकडे कंप्लेंट पाठवा

आला की मारणार आता..

रेकॉर्ड करा तुम्ही विचारायला आले की मार खाणार..

लिहून घे.. काय करायचं ते करा

पोलिसांसमोर सांगतोय आलात तर मार खाणार

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?
Maharashtra Politics: ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; कोकणातील बड्या नेत्याने मशाल घेतली हाती

कान किटवणारी आणि लोकशाहीची अब्रू वेशीवर टांगणारी ही अर्वाच्च भाषा कोणत्याही गल्लीबोळातील गुंडाची नाही, तर नुकतेच सत्तेत सामिल झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचीये. सत्तेची हवा डोक्यात गेल्यानंतर लोकप्रतिनिधी कसा बेभान होतो, याचं हे जळजळीत उदाहरण. त्यांनी दिलेल्या शिव्या एक सुसंस्कृत आणि सजग माध्यम म्हणून आम्ही तुम्हाला ऐकवू शकत नाही. कारण, आया-बहिणींवरून दिलेल्या या घाणेरड्या शिव्या ऐकून महाराष्ट्रातल्या तमाम माता-भगिनींची मान शरमेने खाली जाईल.

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?
Maharashtra Politics: ठाकरेसेना अन् काँग्रेसला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह १५० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सोडली साथ

संजय दिना पाटलांनी शिवसेना सोडून सत्ताधारी शिंदेसेनेत प्रवेश केला आणि तेव्हापासूनच राजकारणात ठिणगी पडलीये. संजय दिना पाटील आणि संजय राऊत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार कलगीतुरा रंगलाय. शिवसैनिकांना बॉम्बनं उडवण्याची धमकी दिल्यानंतर संजय राऊतांनी पाटलांची थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केलीय. याच प्रकरणावर प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवरच खासदार महोदयांनी थेट शिवीगाळ करत राग काढला. याचे तीव्र पडसाद थेट विधिमंडळातही उमटले.

पुन्हा बाईट घ्यायला आलात तर मारेन. अशा मग्रूर भाषेत पत्रकारांना धमकावणाऱ्या या खासदारांमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पण या संजय दिना पाटलांना दबंग म्हणत पक्षात प्रवेश देणारे नेते मात्र या गंभीर प्रकरणावर सारवासारव करताना दिसले. आणि वड्याचं तेल वांग्यावर काढलं.

लोकशाहीत लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणं हा पत्रकारांचा हक्क आहे. Y+ सुरक्षेत फिरणाऱ्या शिंदेच्या या दबंग खासदाराला पत्रकारांच्या साध्या प्रश्नांची इतकी भीती आणि धास्ती का? सत्तेच्या खुर्चीवर बसल्यानंतर बंदुकीचा धाक दाखवण्याचं, पत्रकारांना मारण्याचं लायसन्स या खासदारांना मिळालंय का? गेल्या २४ महिन्यात संजय पाटलांनी मतदारसंघातील एकही काम पुर्ण केलेले नाही. त्यामुळे पत्रकारांना धमक्या देण्या पेक्षा मिळालेला निधी खर्च करण्याची धमक दाखवावी..या बिनकामाच्या मुजोर खासदारावर कायदेशीर कारवाई करण्याची हिंमत पोलीस आयुक्त दाखवणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com