बाळासाहेब ठाकरेंवरही १०० कोटींचा आरोप झाला होता, पण त्यांनी...; शिंदेंच्या शिवसेना नेत्यानं सांगितला त्यावेळचा किस्सा

Sanjay Nirupam On Sanjay Raut Allegation : संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या ५ लाख कोटी रुपयांच्या आरोपांवर संजय निरुपम यांनी प्रत्युत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही एकदा १०० कोटींचे आरोप झाले होते आणि त्यांनी त्याला योग्य उत्तर दिले होते, याची आठवण निरुपम यांनी करून दिली.
Sanjay Nirupam On Sanjay Raut Allegation
Sanjay Nirupam recalls Balasaheb Thackeray’s 100 crore allegation while countering Sanjay Raut’s charges against Eknath Shindesaamtv
Published On
Summary
  • दसऱ्याच्या मेळाव्यात शिंदे आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप झाले.

  • संजय राऊत यांनी शिंदेंची ५ लाख कोटींची संपत्ती असल्याचा आरोप केला होता.

  • संजय निरुपम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर झालेल्या १०० कोटींच्या आरोपाची आठवण करून प्रत्युत्तर दिलंय.

एकनाथ शिंदे यांच्याकडे ५ लाख कोटींची संपत्ती आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यावरून शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी त्यांना सणसणीत उत्तर दिलंय. राऊतांना प्रत्युत्तर देताना निरुपम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर झालेल्या आरोपांची आठवण करून दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही थेट १०० कोटींचा आरोप झाला होता. त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिलं तेच उत्तर राऊतांना आम्ही देऊ असं संजय निरुपम म्हणालेत.

Sanjay Nirupam On Sanjay Raut Allegation
एकनाथ शिंदेंना फसवण्याचा प्रयत्न; पैसे उकळण्यासाठी केला फेक कॉल

दसऱ्याला दोन्ही शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. उद्धव ठाकरे हे कटप्रमुख आहेत, अशी सणसणीत टीका एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंची पाच लाख कोटींची संपत्ती कशी झाली,असा सवाल उपस्थित केला. आता या आरोपाला संजय निरुपम यांनी उत्तर दिलंय.

संजय राऊत हे एकनाथ शिंदेवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपात तथ्य नाही. त्यांनी ज्या प्रमाणे आरोप केलेत तसेच आरोप बाळासाहेब ठाकरेंवर एकाने शंभर कोटींचा आरोप केला होता. संजय राऊत यांच्याकडे शंभर कोटींची मालमत्ता असल्याचा आरोप त्या व्यक्तीनं केला होता, त्याला उत्तर देताना बाळासाहेब ठाकरेंनी आरोप करणाऱ्याला ५० कोटींचा ऑफर दिली होती.

Sanjay Nirupam On Sanjay Raut Allegation
Maharashtra Government: सरकारचं दिवाळीत ₹२१०० खास गिफ्ट, कुणाला होणार फायदा? किटमधील २५ वस्तूंची यादी

जर माझ्याकडे शंभर कोटींची संपत्ती असेल तर त्याचे कागद दाखवा आणि अर्धी मालमत्ता घेऊन जा, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते,. त्यामुळे आता संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर आम्ही तेच म्हणतो. त्यांनी पाच लाख कोटींच्या संपत्तीचे कागदपत्रे दाखवावीत आणि त्यातील अडीच लाख कोटी घेऊन जावेत. असं उत्तर संजय निरुपम यांनी दिलंय.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय निरुपम यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यारही प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंबंधीचे वक्तव्य खरे असण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांच्या उपचारावेळी चार डॉक्टर उपस्थित होते, तेच काय सत्य आहे ते स्पष्ट करू शकतात. एकनाथ शिंदे यांच्यासाठी बालासाहेब ठाकरे हे देवासारखे आहेत, त्यांच्याबद्दल चुकीचे बोलण्याचा प्रश्नच नाही. ठाकरे गटाने रामदास कदम यांच्या पत्नीच्या मृत्यूवर चौकशीची मागणी केली आहे. त्याबाबत निर्णय मुख्यमंत्री शिंदे साहेबच घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com