एकनाथ शिंदेंना फसवण्याचा प्रयत्न; पैसे उकळण्यासाठी केला फेक कॉल

Police Investigate Fraud Call: अकोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी आमदार गोपीकीशन बाजोरिया यांना फेक कॉलद्वारे फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला.
Police Investigate Fraud Call
Police Investigate Fraud Call
Published On
Summary
  • फेक कॉलद्वारे फसवणुकीचा प्रकार.

  • एकनाथ शिंदे यांना फेक कॉलद्वारे फसवण्याचं प्रयत्न.

  • पोलिसांकडून तपास सुरू.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकारण पलीकडची ओळख म्हणजे आरोग्य सेवकाची. राज्यभरातून रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक मोठ्या अपेक्षेने त्यांना मदतीसाठी फोन करत असतात. मात्र, अलीकडे काही फेक कॉलच्या माध्यमातून पैशांसाठी दिशाभूल करण्याचे प्रकार समोर येत आहे. असाच एक अकोल्यातील प्रकरण समोर आलं आहे. यात संबंधित व्यक्तीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मदतीसाठी धावून गेलेले शिवसेनेचे माजी आमदार गोपीकीशन बाजोरिया यांची आर्थिक फसवणुकी करण्याचा प्रयत्न केलाय.

एका अज्ञात व्यक्तीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. 'साहेब, अकोला वाशिम मार्गावर मोठा अपघात झालाय. यात 3 जण ठार तर 4 जण गंभीर जखमी झालेत... आम्ही सर्वजण ठाण्याचे आहोत... आम्हाला काहीच समजत नाहीए... कृपया, तुम्ही आम्हाला मदत करा....' असं त्यानं फोनवरून सांगितलं.

Police Investigate Fraud Call
रात्री ICUमधून विषारी धूर येऊ लागला; रूग्णांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला, ८ जणांचा मृत्यू कसा झाला? प्रत्यक्षदर्शीनं दिली माहिती

एकनाथ शिंदेंनी तात्काळ अकोल्यातील माजी आमदार गोपीकीशन बाजोरिया यांना फोन केला, आणि मदत करण्याचे आदेश दिले. बाजोरियांनी तातडीने शिंदेंना फोन करणाऱ्या व्यक्तीला फोन केला. त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अपघात झाल्याचं स्थळ गाठलं.

बाजोरियांकजून सर्व ठिकाणी फोनाफोनी सुरू होती. ज्या क्रमांकावरून उपमुख्यमंत्री शिंदे यांना फोन आला त्याच्याशी बाजोरिया वारंवार संवाद करीत होते. मात्र, तो व्यक्ती प्रत्येक वेळी त्यांना चुकीची माहिती देत होता. त्या व्यक्तीने न भेटता मदतीसाठी 'फोन पे'चे स्कॅनर आणि नंबर बाजोरिया यांना पाठवले.‌ त्या व्यक्तीने वारंवार पैशांची मागणी केली. या सर्व गोंधळात 3 तासांचा वेळ निघून गेला.

Police Investigate Fraud Call
बॉयफ्रेंडला मैत्रिणीसोबत OYO रूममध्ये रंगेहाथ पकडलं, गर्लफ्रेंडनं शेजारची रूम बुक केली अन्...नेमकं काय घडलं?

मात्र, शेवटी तो व्यक्ती आमदार बाजोरिया आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना भेटलाच नाही. या संदर्भात आमदार गोपीकिशन बाजोरिषा यांनी अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे तोंडी तक्रार केली. फोन करण्यात आलेला नंबर रवी फसाले या नावाने रजिस्टर्ड असल्याची माहिती समोर आली आहे.. बाजोरियांनी अकोला पोलिसांनी या व्यक्तीवर कारवाईची मागणी केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com