
प्रेमप्रकरणातून आत्महत्या.
विवाहित महिलेनं आयुष्य संपवलं.
अवैध संबंधातून घडली घटना.
कर्नाटकातील बंगळूरूमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रेमप्रकरणात विश्वासघात झाल्यानं महिलेनं आत्महत्या केली आहे. मृत महिलेचे एका पुरूषाशी अवैध संबंध होते. तिनं तिच्या मैत्रिणीची तिच्या प्रियकराशी ओळख करून दिली. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. मैत्रिण आणि प्रियकर दोघांना ओयो हॉटेलमध्ये पाहिल्यानंतर तिची पायाखालची वाळू सरकली. तिनं रूममध्येच आत्महत्या केली.
हा संपूर्ण प्रकार बँगळूरूतील बसवेश्वरातील ओयो चॅम्पियन कम्फर्ट लॉजमध्ये घडली. यशोदा (वय वर्ष ३८) असे मृत महिलेचं नाव आहे. या महिलेचं लग्न झालं असून, तिला २ मुलं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लग्न झालेलं असतानाही तिचं ऑडिटर विश्वनाथसोबत अवैध संबंध सुरू होते. यशोदा आणि विश्वनाथ एकमेकांच्या शेजारी राहतात. ७ वर्ष त्यांच्यात प्रेमसंबंध होते.
अलिकडेच यशोदाने तिच्या मैत्रिणीची विश्वनाथशी ओळख करून दिली होती. सात वर्षांपासून यशोदासोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या या व्यक्तीनं तिच्या मैत्रिणीशीही प्रेमसंबंध ठेवले. दोघेही लपून भेटायचे. याची माहिती यशोदाला मिळाली. यशोदाला हळूहळू दोघांवर संशय येऊ लागला. दोघेही लॉजवर गेल्याची माहिती यशोदाला मिळाली.
यशोदाने लॉजवर धाड टाकली. दोघांनाही रंगेहाथ पकडलं. तिला नंतर मानसिक धक्का बसला. तिनं त्याच हॉटेलमधील शेजारची रूम बुक केली. नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतल. तसेच पोस्टमॉर्टमसाठी रूग्णालयात पाठवलं. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.