Maharashtra MLC election exit poll 2026 seat prediction : राज्यातील विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान पार पडल्यानंतर 'साम टीव्ही'कडून एक्झिट पोल जारी करण्यात आल. या विशेष एक्झिट पोलमधून धक्कादायक राजकीय अंदाज समोर आले आहेत. एकूण ५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झालेय. पुणे आणि इतर मतदारसंघांतून भाजपला २ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मविआच्या वाट्याला फक्त एक जागा येईल, असा प्राथमिक अंदाज आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
भाजप: २ जागा
शिवसेना (शिंदे गट): १ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष): १ जागा
काँग्रेस : १ जागा
उद्धव टाकरेंची शिवसेना : ०० जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ०० जागा
राज्यातील विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान आज पार पडले. पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध मतदारसंघांत राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली. मित्रपक्षांमधील नाराजी आणि बंडखोरीमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे. या निवडणुकीत नेमकी बाजी कोण मारणार? आणि संभाव्य आमदार कोण असणार? पाहा, 'साम टीव्ही'चा 'विधानपरिषदेचा एक्झिट पोल..
पुणे पदवीधर -
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव यांच्यात प्रमुख लढत आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये डॉ. स्मिता जाधव यांचे पारडे जड असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुणे शिक्षक -
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांच्या विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महायुतीचे कौस्तुभ गावडे आणि महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर रिंगणात आहेत.
संभाजीनगर -
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण, डॉ. प्रतापसिंह पाटील आणि दिलीप घुगे यांच्यात तिरंगी लढत झाली. साम टीव्हीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.
अमरावती - काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांचे पारडे जड आहे. महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक मैदानात आहेत.
नागपूर - भाजपकडून सुधाकर कोहळे, काँग्रेसकडून विद्यमान आमदार अभिजित वंजारी, तर अपक्ष म्हणून नितेश कराळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचे पारडे जड असल्याचा अंदाज.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.