Sharad Pawar-Eknath Khadse News : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, जळगावात अनेक नेत्यांची भाजपमध्ये घरवापसी

Jalgaon Political News : भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांना पक्षाची साथ सोडली आहे.
Sharad Pawar-Eknath Khadse News
Sharad Pawar-Eknath Khadse News Saam TV
Published On: 

Jalgaon News :

राष्ट्रवादीमधील फुटीनंतर पक्षात दोन गट पडले आहेत. अनेक बडे नेते अजित पवारांसोबत गेल्याने शरद पवारांनी पुन्हा पक्षबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र शरद पवार यांना आणखी एक धक्का बसला आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांच्यासोबतच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली आहे.

एकनाथ खडसे यांच्यासोबत भुसावळमधील पाच माजी नगरसेवक आणि इतर पदाधिऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता या सर्वांनी पुन्हा भाजपची वाट धरली आहे. भुसावळमधील स्थानिक राजकारणात हा राष्ट्रवादीला आणि एकनाथ खडसे यांना मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar-Eknath Khadse News
Mumbai Ganeshotsav 2023 : मुंबईतील गणपती आगमन-विसर्जन मार्गावरील १३ पूल धोकादायक, पुलावर जास्त वेळ उभे न राहण्याचा BMCचा इशारा

भाजप आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीमध्ये या नेत्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंसोबत ९ नगरसेवकांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यापैकी ७ नगरसेवक आता पुन्हा स्वगृही परतले आहेत. (Political News)

Sharad Pawar-Eknath Khadse News
Samruddhi Mahamarg Theft News: समृद्धी महामार्गावर अपघातानंतर चोरट्यांचा सुळसुळाट; लाखोंचा मुद्देमाल लंपास

भाजपमध्ये गेलेल पदाधिकारी कोण?

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक बोधराज चौधरी, पुरुषोत्तम नारखेडे, माजी नगरसेविका शोभा नेमाडे, दिनेश नेमाडे आणि अनिकेत पाटील यांचा समावेश आहे. एकनाथ खडसे यांच्या निकटवर्तीयांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये एकनाथ खडसे यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.