शरद पवारांचे खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला, राष्ट्रवादी NDAसोबत जाणार? घडामोडींना वेग

Sharad Pawar Faction MPs Hold Closed-Door Talks With PM Modi: शरद पवारांच्या भेटीनंतर त्यांच्या पक्षाचे 8 खासदारांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतलीये. 15 मिनिटे बंद दाराआड खासदार आणि मोदींमध्ये बैठक पार पडली. पवारांच्या खासदारांनी घेतलेल्या भेटीनंतर इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी विश्वास दाखवलाय. तर सत्ताधारी पक्षानं समर्थन केलंय... पाहूयात यावरचा एक रिपोर्ट...
SHARAD PAWAR MPS MEET PM MODI, POLITICAL SPECULATION INTENSIFIES
SHARAD PAWAR MPS MEET PM MODI, POLITICAL SPECULATION INTENSIFIESsaam tv
Published On

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भेट झालीये. पवारांचे 8 खासदार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात 15 मिनिटे बैठक झाली. विशेष म्हणजे, गेल्या 25 दिवसांतील पवारांच्या राष्ट्रवादीची ही चौथी भेट ठरलीये. यापूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी अमित शाहांची भेट घेतली. आता सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या सर्व आठ खासदारांनी मोदींची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मात्र राज्यातल्या काही महापुरूषांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यासाठी आणि विकासकामांसाठी भेट घेतल्याचा दावा खासदार अमोल कोल्हेंनी केलाय.

तर दुसरीकडे संजय राऊतांनीही पवार इंडिया आघाडीविरोधात जाणार नसल्याचा विश्वास व्यक्त केलाय. मुख्यमंत्र्यांनी मात्र भेटीचं समर्थन केलंय़.

डिलिमिटेशन घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर मोदी सरकार कमालीचं अस्वस्थ आहे. आणि हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी केंद्राची गेल्या काही महिन्यांपासून जुळवाजुळव सुरू आहे. आणि त्यासाठीच प्रादेशिक पक्षांची मदत घेण्याची रणनीती भाजपानं आखलीय. आणि पवारांच्या मोदी-शाहांसोबतच्या भेटीगाठी त्याचाच भाग असल्याची चर्चा रंगलीय. त्यामुळे हे विधेयक आलंच तर पवारांची काय भूमिका असेल याबाबत साऱ्या देशात उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com