जमीन, पिकं अन् मातीही गेली, शेतकरी उघड्यावर; शरद पवारांनी सांगितलं केंद्राने कशी करायची मदत, वाचा...

Sharad Pawar Demands Urgent Relief for Farmers : मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक नद्यांना महापूर आलाय. त्यामुळे पूराचे पाणी घरात शिरले, शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला. शेतकऱ्यांसाठी पवारांनी केंद्राकडे केली मागणी
sharad pawar news
sharad pawar Saam tv
Published On

Sharad Pawar demands Centre’s intervention for Maharashtra flood-hit farmers : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने रौद्ररुप धारण केले. कोसळधारामुळे शेतात अन् घरामध्ये पूराचे पाणी आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला. सोलापूर, बीड, जालनासह काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, सरकारकडून मदत करण्यात येत आहे. काही ठिकाणी पंचनामे अतिशय वेगात सुरू आहेत. सरकार शेतकऱ्यांना लवकर मदत करेल, असे मंत्र्यांकडून सांगण्यात येतेय. आज शरद पवार यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करवी, अशी मागणी केली. केंद्र सरकारकडून राज्याला मदत करण्यासाठी ज्या योजना आहेत ते वापरून नुकसानभरपाई करणे गरजेचे आहे, असे शरद पवार म्हणाले.

राज्याला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ज्या योजना आहेत, त्या वापरून लवकर नुकसानभरपाई देणं गरजेचं आहे. जमीन वाहून गेली, पिक गेली, माती गेली या तिन्ही गोष्टींची नुकसान भरपाई सरकारने दिली पाहिजे. अनेक ठिकाणी गुरे वाहून गेली आहेत. या सगळ्या गोष्टीकडे राज्य सरकार ने तात्काळ बघावं, , असे शरद पवार म्हणाले. शेतकऱ्याला विश्वासात घेऊन पंचनामे केले पाहिजेत. तातडीची आणि कायमस्वरूपीची मदत झाली पाहिजे, अशीही मागणी पवारांनी केली.

sharad pawar news
मैदानात उतरणारा खासदार! छातीभर पाण्यात ओमराजे उतरले अन् आजी-नातवाला वाचवले, पाहा व्हिडिओ

शेतकरी राजा पुन्हा कसा उभा राहील, याचा सरकारला विचार करावा लागेल. हवामान खात्याने सांगितलं आहे की पुढचे ४ दिवस पाऊस आहे. हवामान खात्याने जे सांगितलं ते ते घडत चाललं आहे, असेही पवार म्हणाले. दरम्यान, राज्यात जवळपास ३० जिल्ह्यांत अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं राज्याच्या स्थितीवर लक्ष असून दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितलेय.

sharad pawar news
कार-ट्रकचा हायवेवर भयंकर अपघात, एकाच कुटुंबातील ४ जणांचा जळून मृत्यू

मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने शेतकऱ्याला सावध केलं पाहिजे. यंदा अभूतपूर्व पाऊस राज्यात पडला आहे. जे जिल्हे दुष्काळासाठी प्रसिद्ध आहेत त्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टी याचा परिणाम शेतकऱ्यांच्या संसारावर झाला आहे. सोयाबीन चे पीक मोठ्या प्रमाणावर होतं. इतर पिकं सुद्धा मोठ्या प्रमाणावर होती. सोयाबीनचे पीक भरवशाचे पिक असते. सोयाबीनची अनेक पिकं कुजून गेली आहेत, सोयाबीन उध्वस्त झाले आहे. सोलापूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. असे अस्मानी संकट येतं तेव्हा त्यांना मदत करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे, असे शरद पवार म्हणाले.

sharad pawar news
Sharad Pawar Setback : शरद पवारांना सर्वात मोठा धक्का, पश्चिम महाराष्ट्रातील आमदार साथ सोडणार, भरसभेत केलं मोठं वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com