
सिंधुदुर्ग : 'अतिरेक्यांनी जी अॅक्शन घेतली ती भारताच्या विरोधी घेतली आहे. देशाच्या विरोधात असं कोणी निर्णय घेतं तर तिथे राजकारण करायचं नसतं. त्या दृष्टीने आम्ही लक्ष घातलं आहे. सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली, त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. पण सरकारने हे अधिक गांभीर्याने घ्यायला पाहिजे. पण गेले काही दिवस सरकारच्या वतीनं सतत सांगितलं जात होतं. आम्ही दहशतवाद मोडून काढला, दहशतवाद आम्ही संपवला', असं म्हणत शरद पवारांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं. ते आज सिंधुदुर्ग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्रीयमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याविषयी त्यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, 'आज ज्यांनी हल्ला केला त्यांना शोधायला हवं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मी आज कोणाला काढा, कोणाला सोडा याबद्दल मी बोलणार नाही,' असं म्हणत शरद पवारांनी स्पष्टच उत्तर दिलं. 'पण घडलेली घटना बघितल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे हे स्पष्ट आहे. ही कमतरता सरकारने घालवायला हवी. सरकारने अधिक गांभीर्याने घ्यावे. सरकार कमतरता आहे हे मान्य करत असेल तर त्यांनी तातडीने पावले टाकावीत. काही कामात आम्हा लोकांचं देखील सहकार्य राहील', असंही पवारांनी बोलून दाखवलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या मिश्किल वक्तव्यांनी चर्चेत असतात. अशातच त्यांनी आज पुणे येथे एका पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिश्किल टोला लगावला आहे. मुंबईत गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा एक पुस्तक लिहायचा सल्ला देणार असल्याचा अजित पवारांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा असे विरोधी पक्ष नेते असताना एक पुस्तक लिहिलं आहे. देवेंद्र फडणवीस तूम्ही दुसर पुस्तक लिहा त्याला नाव द्या 'मी पुन्हा येईन' 'मी पुन्हा येईन' 'मी पुन्हा येईन' असं अजित पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.