
Sharad Pawar Asked Question To CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या आरोप-प्रत्यारोपाचा पुढच्या अंकाला सुरूवात झाली आहे. त्याला कारण, ईव्हीएम आणि मारकडवाडी ठरलेय. ईव्हीएमवरून देशातील जनतेची दिशाभूल करू नका, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना काही आकडे दाखवले होते. त्यावरून आता शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेय. यामध्ये तुम्ही राजकारण करू नका, लोकांना भेटणं यात चुकीचं काय आहे, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केलाय.
मारकडवाडी येथे शरद पवार यांनी आज भेट दिली. शरद पवार यांनी मारकडवाडी येथील नागरिकांची भेट घेऊन तुमचा मुद्दा आम्ही देशभरात घेऊन जाऊ, असे अश्वासन दिले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. शरद पवार म्हणाले की, "काल मुख्यमंत्री म्हटले पवार साहेबांनी हे करणं चुकीचं आहे. यात काय चुकीचं आहे, तुम्हाला भेटणं चुकीचं आहे? आवाज उठवणं चुकीचं आहे? माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, यात राजकारण आणू नका. आम्हाला याचं राजकारण करायचं नाही. लोकांच्या मनात शंका आहे. तो संशय दूर करायचा आहे. लोकशाही कशासाठी आहे. लोकांचे अधिकार काय आहे. हे अधिकार जतन करण्यासाटी अडचण येत असेल तर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला पाहिजे"
गावानं ठरवलं वेगळ्या दिशेनं जायचं , त्यावर तुमच्यावर खटला भरला. तुम्हाला तुमच्यात गावात जमावबंदी केली. या सर्वाचं रेकॅार्ड द्या. जमावबंदी, तुमच्यावर दाखल केलेले गुन्हे . याचं रेकॉर्ड द्या. आम्ही ते देशभरात नेऊ, निवडणूक आयोगाकडे आम्ही देऊ, पंतप्रधानांकडे देऊ, असे अश्वासन शरद पवार यांनी मारकडवाडी येथील ग्रामस्थांना दिले. अनेक देशांनी ईव्हीएमचा त्याग केला. आज जगातला सर्वात मोठा देश असलेल्या अमेरिकामध्ये ईव्हीएम वापरले जात नाही. युरोप खंडातील सर्व देश ईव्हीएम वापरत नाहीत, असेही शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो, या विषयावर तुम्ही संबंध देशाला दिशा देण्याचं काम केलंय
- जे देशाच्या लक्षात आलं नाही, ते तुमच्या लक्षात कसं आलं. बॅलेटवर मतदान घेण्याचं
- निवडणूक पद्धती मध्ये काही शंका निर्माण झाली.
- काही निकाल असे आले त्यामुळे अनेकांच्या मनात शंका आली. ते अस्वस्थ झाले
- आम्ही काही माहीती गोळा केली. ती माहिती काय सांगते, लोकांनी मतदान केलं मात्र निकाल जे आले ते त्यांना अपेक्षित नाही.
- यात बदल केला पाहीजे, याबाबत जागृती तुम्ही केली.
- मला आश्चर्य वाटतं, मी तुमच्या इथं यायचं ठरवलं. चार पाच दिवसांपूर्वी.
- उद्या पोलीस खात्याने निर्णय घेतला की, मी बोलायचं नाही. आणि तुम्ही ऐकायचं नाही. असा कुठं कायदा असतो का
- गावानं ठरवलं वेगळ्या दिशेनं जायचं , त्यावर तुमच्यावर खटला भरला
- तुम्हाला तुमच्यात गावात जमावबंदी केली.
- या सर्वाचं रेकॅार्ड द्या. जमावबंदी, तुमच्यावर दाखल केलेले गुन्हे . याचं रेकॉर्ड द्या. आम्ही ते देशभरात नेऊ, निवडणूक आयोगाकडे आम्ही देऊ, पंतप्रधानांकडे देऊ
- मुंबईत, दिल्लीत सर्व ठीकाणी आम्ही हा विषय मांडु
- जानकर यांना मागील काही दिवस झोप नाही.
- मी इथुन एकदा निवडणूक लढवली आहे. हे आता माझ्या लक्षात आलं. त्यावेळी मी मतं मागायला देखील आलो नाही. तरीही तुम्ही मला भरपूर मतं दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.