शनि देवावर भेसळयुक्त तेलाचा अभिषेक?भेसळयुक्त तेल विक्रेत्यांवर कारवाई करा

Shani Shingnapur Hit by Adulteration Row: राज्यात भेसळमाफियांवर FDA कारवाई करत असताना आता हिंदूंच्या श्रद्धास्थान असणाऱ्या ठिकाणांवरही भेसळीचा सुळसुळाट पाहायला मिळतोय...शनिशिंगणापुरमध्ये भेसळयुक्त तेलाचा शनि देवावर अभिषेख होत असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलाय..,नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात या रिपोर्टमधून...
SHANI SHINGNAPUR: ADULTERATED OIL ALLEGEDLY USED FOR SHANI DEV ABHISHEK | AHILYANAGAR NEWS
SHANI SHINGNAPUR: ADULTERATED OIL ALLEGEDLY USED FOR SHANI DEV ABHISHEK | AHILYANAGAR NEWSsaam tv
Published On

दुधासह अन्नपदार्थांची भेसळ रोखण्यासाठी एकीकडे FDAच्या अधिकाऱ्याचं राज्यभरात धाडसत्र सुरु आहे... अशातच अहिल्यानगरमधील प्रसिद्ध शनिशिंगणापूरमध्ये भेसळमाफीयांनी कळस गाठलाय.... शनि देवावर भेसळयुक्त तेलाचा अभिषेक करण्याची वेळ भाविकांवर आलीय.. कारण काही विक्रेत भेसळयुक्त तेलाची विक्री करत असल्याचा आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखवत असल्याचा आरोप राष्ट्रीय श्रीराम संघांनं केलाय. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शनीशिंगणापूरमध्ये भेसळयुक्त तेलाची कशी विक्री होतेय...ऐका...

शनिमूर्तीवर तेल वाहण्याची परंपरा असल्याने येथील दुकानांमधून मोठ्या प्रमाणात दररोज तेलाची विक्री होते. भाविकांची फसवणुक रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला यासंदर्भात तक्रार करण्यात आल्याची माहिती देवस्थानच्या प्रशासकांनी दिलीय....

याआधीच गैरव्यवहारांमुळे शनिशिंगणापूरची देवस्थान कमिटी वादात सापडली होती. म्हणून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. आता तेलातील भेसळीमुळे शनीशिंगणापूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com