Shahid Daud : सांगलीहून शहीद दौडला प्रारंभ, मुंबईत 26/11 हल्ल्यातील शहिदांना करणार अभिवादन

सांगली ते मुंबई अशी ४७० किलोमीटरची ही दौड आहे.
sangli
sanglisaam tv
Published On

Sangli News :

सांगली ते मुंबई शहीद दौडला आज (साेमवार) सांगली येथून प्रारंभ झाला. २६/११ मधील दहशतवादी (26/11 mumbai attack) हल्ल्यात शहीद पोलिसांना या दौडच्या माध्यमातून अभिवादन करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. येत्या २६ नोव्हेंबरला गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत दौडीचा समारोप होणार आहे. (Maharashtra News)

sangli
Shashikant Shinde : आमदार शशिकांत शिंदेंवर अटकेची टांगती तलवार ? जाणून घ्या प्रकरण

सांगलीतील शहीद अशोक कामटे फाउंडेशनकडून (ashok kamte foundation) या शहीद दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. शहिदांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात येणारी ही देशातील एकमेव मॅरेथॉन आहे.

या दौड मध्ये मशाल व तिरंगा हाती घेत २५ धावपटू सहभागी झाले आहेत. २६ नोव्हेंबर रोजी ही दौड मुंबईत पोचणार आहे. सांगली, तासगाव विटा मार्गे सातारा, पुणे, लोणावळा, खंडाळा, खोपोली, पनवेल, नवी मुंबई मार्गे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे ही दौड २६ नोव्हेंबर रोजी दाखल होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २६ नोव्हेंबर रोजी या दौडीचा समारोप आणि शहीदांना अभिवादन कार्यक्रम पार पडणार आहे अशी माहिती आयोजकांच्यावतीने समित कदम यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

sangli
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी निमित्त 30 नाेव्हेंबरपर्यंत घेता येणार विठ्ठल रखुमाईचे 24 तास दर्शन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com