Shahapur Accident : भीषण अपघाताने राजा-राणीचा सुखाचा संसार उद्ध्वस्त; ५ वर्षाची चिमुकली पोरकी, हृदय हेलावणारी घटना

Shahapur Accident update : शहापूरमधील अपघातात अमळनेरमधील जोडप्याचा मृत्यू झाला आहे.दोघांच्या मृत्यूने ५ वर्षाची चिमुकली पोरकी झाली. या भीषण अपघातानंतर स्थानिक लोक मदतीला धावले होते.
shahapur accident
shahapur saam tv
Published On

फैयाज शेख, साम टीव्ही

शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या भीषण अपघातात एका जोडप्याचाही मृत्यू झाला. तर या जोडप्याची पाच वर्षाची चिमुकली थोडक्यात बचावली असून तिच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. आई-वडिलाच्या मृत्यूने वयाच्या पाचव्या वर्षी चिमुकली पोरकी झाली.

shahapur accident
Nashik Accident : मित्र आयुष्यभरासाठी निघून गेले; अपघाताचं संकट १० मिनिटाआधीच ओळखलं, तरुणाने सांगितला थरारक घटनाक्रम

सध्या ५ वर्षीय चिमुकली जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षी आई-वडिलांचा आधार गेल्याने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात चिमुकलीच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. मुंबई-नाशिक महामार्गावर पहाटेच्या सुमारास ५ वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यात ३ जणांचा मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले. तर या जखमींपैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

shahapur accident
Best Bus Accidents : ५ वर्षे, ८३४ बेस्ट बस अपघात, ८८ मृत्यू; धक्कादायक आकडेवारी

अपघातामधील जखमींवर ठाणे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पियुष पाटील आणि रूंदा पाटील या आई वडिलांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची 5 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. या मुलीवर शहापूर येथील क्रीस्टीकेअर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

shahapur accident
Accident : मुंबई नाशिक महामार्गावर ५ वाहनांचा विचित्र अपघात, ३ जणांचा मृत्यू, १४ जखमी

चोपडा बदलापूर ट्रॅव्हल्सच्या अपघातात जोडप्याचा मृत्यू

मुंबई-नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. १५ रोजी पहाटे ३.३४ वाजता झालेल्या अपघातात अमळेरच्या जोडप्याचा मृत्यू झाला. दोघे चोपडा बदलापूर ट्रॅव्हल्स बसने प्रवास करत होते. त्यांची बस मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथील पुलावर आल्यानंतर कंटेनर, ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स खासगी बसचा अपघात झाला. या पाच वाहनांच्या विचित्र अपघातात अमळनेरचे पियुष पाटील आणि वृंदा पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पियुष हे मुंबई महापालिकेत नोकरीला होते, तर वृंदा या बोरगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत युवा प्रशिक्षणार्थी होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com