Best Bus Accidents : ५ वर्षे, ८३४ बेस्ट बस अपघात, ८८ मृत्यू; धक्कादायक आकडेवारी

Best Bus Accidents In Last Five Years : आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्टकडे मागील पाच वर्षात झालेल्या अपघाताची आकडेवारी मागितली होती. तेव्हा ही धक्कादायक आकडेवारी समोर आली.
Best bus accidents records in five years
Best bus accidents records in five yearsSaam Tv
Published On

संजय गडदे साम प्रतिनिधी

Best Bus Accidents : मागच्या ५ वर्षांमध्ये बेस्टचे ८३४ बस अपघात झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. यात ८८ जीवितहानी झाल्याची कबूलीही बेस्टने दिली आहे. मरणांकत आणि जखमींना एकूण ४२.४० कोटी रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई देण्यात आली आहे. पाच वर्षात १४ चालकांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर २४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना बेस्ट प्रशासनाने ही माहिती दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट प्रशासनाकडे मागच्या पाच वर्षातील अपघातांची, जीवितहानी आणि आर्थिक नुकसान भरपाईची माहिती विचारली होती. यावर बेस्टचे वरिष्ठ वाहतूक अधिकारी ईगाल बेंजामिन यांनी सविस्तर माहिती दिली आहे. या माहितीनुसार, ५ वर्षात बेस्टकडून ८३४ अपघात झाले आहेत.

एकूण ८३४ अपघातांपैकी यात बेस्ट कर्मचाऱ्यांकडून ३५२ अपघात झाले असून यात जीवितहानी झालेल्यांची संख्या ५१ आहे. तर खाजगी कंत्राटदारांकडून झालेल्या अपघाताची संख्या ४८२ असून ३७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचा अर्थ पाच वर्षात ८८ नागरिक बेस्ट अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत.

Best bus accidents records in five years
Vashi accident news: नाईट शिफ्ट करून घरी परतताना काळाचा घाला, कारच्या धडकेत २ तरूणींचा मृत्यू

वर्ष २०२२-२३ आणि वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वाधिक प्रत्येकी २१ जीवितहानी झाली होती. पाच वर्षात ४२.४० कोटी रुपये आर्थिक नुकसान भरपाईसाठी खर्च झाले आहेत. यात सर्वाधिक रक्कम ही वर्ष २०२२-२३ मध्ये देण्यात आली होती. तेव्हा १०७ अपघातांमध्ये १२.४० कोटी नुकसान भरपाई दिली गेली. वर्ष २०१९-२० मध्ये ९.५५ कोटी, वर्ष २०२०-२१ मध्ये ३.४४ कोटी, वर्ष २०२१-२२ मध्ये ९.४५ कोटी, वर्ष २०२३-२४ मध्ये ७.५४ कोटी नुकसान भरपाई देण्यात आली.

मागील पाच वर्षात अपघातामुळे बडतर्फ केलेल्या चालक कर्मचाऱ्यांची संख्या १२ आहे. तर वैयक्तिक इजा प्रकरणात २ कर्मचाऱ्यांनी बडतर्फ केले गेले होते. या व्यतिरिक्त वैयक्तिक इजा प्रकरणात २४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच अन्य प्रकारात ताकीद देणे, समज देणे, सक्त ताकीद देणे, वसुली, द्वंद्वतन श्रेणीत कपात अशा प्रकारे कारवाई करण्यात आली होती.

Best bus accidents records in five years
Pune Traffic : १० मिनिटांसाठी अर्धा तास, पुण्यात इतकी वाहतूक कोंडी का? तज्ज्ञांनी सांगितला ट्रॅफिक जामवरील उतारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com