यवतमाळच्या आर्णी मध्ये परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार

समाज माध्यमाचा दुरुपयोग करून नांदेड जिल्ह्यातील दत्ता राठोड नामक इसमाने कर्नाटक राज्यातील बेंगलौर येथील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लैंगिक अत्याचार केले.
यवतमाळच्या आर्णी मध्ये परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
यवतमाळच्या आर्णी मध्ये परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचारSaam Tv News

संजय राठोड

यवतमाळ - समाज माध्यमाचा दुरुपयोग करून नांदेड जिल्ह्यातील विवाहीत दत्ता हिरामण राठोड नामक इसमाने कर्नाटक राज्यातील बेंगलौर येथील अल्पवयीन मुलीला प्रेमात ओढले आणि तिला नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे बोलविले. मात्र आरोपी दत्ताला माहूर मध्ये ओळखत असल्याने त्याने पिडीत मुलीला आर्णी येथील मारीया सलमान खान हिच्या घरी आणले. गुरूवार पासून ते दोघे मारीयाच्या घरी एकाच खोलीत राहत असल्याने आर्णी पोलीसांना संशय आल्याने त्यांनी रविवारी दोघांना पोलिस स्टेशन मध्ये बोलावून विचारपूस केली असता पिडीत अल्पवयीन मुलीने सत्य बोलून दाखविल्याने आर्णी पोलीसांनी बेंगलौर पोलिसांना संपर्क करून त्यांना माहिती दिली. (Sexual assault on a provincial minor girl in Arni, Yavatmal)

हे देखील पहा -

बेंगलौर शहरातील १६ वर्षांच्या मुलीसोबत फेसबूकवर फेक अकाऊंट बनवून त्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मैत्री केली. नंतर मला तुझ्याशी प्रेम झाले आहे, तुझ्या विना मी जिंवत राहू शकत नाही असे म्हणुन त्या पिडीत मुलीला बेंगलौर वरून नागपूर मार्गे माहूरला बोलविले. माहूर वरून ते दोघे आर्णी येथील मारीया खान यांच्या घरी तीन दिवस एकाच खोलीत थांबले. दरम्यान अल्पवयीन मुलीवर दत्ता राठोड याने अत्याचार केल्याचे पिडीत मुलीने पोलिसांना सांगितले. बेंगलौर शहर पोलीस स्टेशन मध्ये किडनॅप केल्याचा गुन्हा दाखल आहे.

यवतमाळच्या आर्णी मध्ये परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
नागपूरात लॉकडाऊनमध्ये लाचखोरांची चांदी! महसूल विभाग अव्वल

सोमवारी दुपारीच्या दरम्यान आर्णी पोलीसांच्या मदतीने मारीया खानच्या घरातून बेंगलौर पोलिसांनी महिलेसह पिडीत मुलगी आणि दोन आरोपींना ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी केली असता पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. मानवी तस्करी करणारी टोळी सक्रीय असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून नांदेड जिल्ह्यातील आरोपी दत्ता याने आर्णी येथील मारीया खान हिच्या घरी पिडीत अल्पवयीन मुलीला कशाप्रकारे आणलं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com